वानखेडेंकडून तपास काढून घेतला आणि २४ तासांच्या आत ‘एनसीबी’चे पथक मुंबईत दाखल!

यात नवाब मलिक यांचे जावई समीर खान आणि अरमान कोहली यांच्या प्रकरणांचाही समावेश आहे.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSarkarnama

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह एकूण सहा प्रकरणांचा तपास मुंबई एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून शुक्रवारी (ता. ५ नोव्हेंबर) काढून घेण्यात आला आहे. त्याची घोषणा होऊनही २४ तास उलटण्यापूर्वीच दिल्ली एनसीबीची टीम आर्यन खान प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीवरून अमली पदार्थविरोधी (एनसीबी) विशेष चौकशी पथक शनिवारी (ता. ६ नोव्हेंबर) मुंबईत दाखल झाले. आता ही टीम आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह इतर पाच प्रकरणांचा तपास करणार आहे. (NCB's special team in Mumbai to investigate six cases including Aryan Khan)

आर्यन खान प्रकरण आणि इतर पाच प्रकरणांचा तपास ‘एनसीबी’च्या मुंबई विभागाकडून काढून घेण्यात आला आहे. यात नवाब मलिक यांचे जावई समीर खान आणि अरमान कोहली यांच्या प्रकरणांचाही समावेश आहे.

Sameer Wankhede
काँग्रेसचा चोपडाच्या जागेवरून राष्ट्रवादीला इशारा : अरुण गुजराथी, एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला!

‘एनसीबी’चे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानप्रकरणी झालेले गंभीर आरोप बघता ‘एनसीबी’ने या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला होता. ‘एनसीबी’चे उपमहासंचालक संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे पथक पुढील तपास करणार आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास काढून घेतल्याचा इन्कार वानखेडे यांनी केला होता. मी स्वतःहून आपल्याकडून तपास काढून घेण्याची विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळे माझ्याकडून हा तपास काढून घेतला नाही तर माझ्या विनंतीनुसार तो दुसऱ्याकडे दिल्याचे स्पष्टीकरण वानखेडे यांनी दिले होते.

Sameer Wankhede
शाब्बास अभिजित...! : सांगोला कारखाना सुरू करणाऱ्या पंढरपूरच्या पाटलांचे शरद पवारांकडून कौतुक

दरम्यान, समीर वानखेडे यांच्यासंदर्भात पोलखोल सुरूच ठेवण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. यासंदर्भात उद्या, रविवारी (ता. ७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी ‘ट्विट’ करून सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com