शाहरूखखान याच्या चालकाला समन्स : आर्यनला ड्रग्ज कोणी पोहचिवले?

एनसीबीचा (NCB) आता क्रुझ ड्रग प्रकरणाच्या मूळाशी जाण्याची निर्णय
शाहरूखखान याच्या चालकाला समन्स : आर्यनला ड्रग्ज कोणी पोहचिवले?
Shahrukhkhan web

मुंबई : एनसीबीवर (अमली पदार्थ विरोधी पथक) आरोपाच्या फैऱ्या झाडल्या गेल्यानंतर दुसऱ्यांदा शनिवारी एनसीबीच्या पथकाने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. एनसीबीच्या (NCB) म्हणण्यानुसार एकूण १४ इसमांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यात सहा जणांना सोडण्यात आले. त्यांचा या रेव्ह पार्टीशी काहीच संबंध नव्हता. म्हणून त्यांना सोडल्याचा खुलासा केला. त्यामुळे एनसीबीवर होणारे आरोप हे बिनबुडाचे असून प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान एनसीबीचे पथक आता शाहरुख खान याच्या वाहनचालकांची चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

Shahrukhkhan
आर्यन खानच्या आधीही या' स्टारकिड्सनी खाल्ली आहे जेलची हवा

क्रूझवर येण्यापूर्वी आर्यन आणि अरमान हे दोघे शाहरूखखान याच्या `मन्नत` निवासस्थानी भेटले होते. त्यानंतर दोघे आर्यनच्या गाडीतून क्रूझवर आले. आर्यनकडे ड्रग्ज आढळून आलेले नसले तरी अरबाजकडे ड्रग्ज आढळून आले आहे. आर्यनने ड्रग्जचे सेवनं केल्याचे तपासात समोर आल्याने संबंधित दोघांना क्रुझवर सोडणाऱ्या गाडीच्या चालकाला समन्स बजावलेचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेत्याच्या नातेवाईकांना एनसीबीने कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वरसिंग यांनी याबाबत स्पष्टीकरण करत हे आरोप फेटाळले.

ते म्हणाले, ``ताब्यात घेतलेल्या १४ जणांना एनडीपीएस सेक्शन ६७ नुसार नोटीस देऊन त्यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविल्याचा खुलासा केला. आर्यन खान यांच्यासह ८ लोकांना अटक करण्यात आली. तर इतर ६ जणांना सोडण्यात आले. पुढे चौकशीसाठी आवश्यक वाटल्यास कायद्यानुसार त्यांना बोलावण्यात येईल. क्रूझ रेव्ह पार्टीतील ऑपरेशनमध्ये तब्बल ९ साक्षीदाराचा सहभाग करण्यात आला होता. त्यापैकी मनीष भानुशाली आणि किरण प्रकाश गोसावी यांचा सहभाग होता. २/१०/२०२१ पूर्वीच आम्हाला या आॅपरेशनबाबत माहिती होती.

Shahrukhkhan
आर्यन खानच्या व्हॉट्स अॅपमध्ये आंतरराष्ट्रीय लिंक; न्यायालयानं दिला झटका

क्रुझवरील रेव्ह पार्टीत उच्चभू लोकांचा समावेश होता. दरम्यान त्यांच्या आणि एनसीबीच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण ठेवण्यात आले होते. या घटनेचा पंचनामा हा घटनास्थळावर केला. त्यावर दिनांक, वेळ यांचा उल्लेख आहे. सादर पंचनामा हे न्यायालयाचे रेकॉर्ड असून त्याचा समावेश आरोपपत्रात करण्यात येणार आहे. चौकशीसाठी एनसीबीने १८ जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर एनसीबीने ६ जणांना अटक केली. रिषभ सचदेव हा मोहित भारतीय जनता पार्टीचे नेते यांचा मेहुणा, अमीर फर्निचरवाला आणि प्रतीक गाभा याना नंतर सोडून देण्यात आले.

मलिक यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांनी समीर वानखेडे याना या तिघांना सोडणायसाठी कॉल केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे समीर वानखेडे आणि सचदेव, फर्निचरवाला आणि गाभा यांच्या कोळीचा सीडीआर काढावा आणि चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

मुंद्रा पोर्टवरील ड्रग्ज साठ्याच्या केसवरुन लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही यास दुजोर देत रेव्ह पार्टी प्रकरणात भाजपच्या नेत्यांच्या नातेवाईकांना सोडून देण्यात आले. कुठल्या अधिकाराने या भाजपच्या लोकांना साक्षीदार बनविण्यात आले, याचा खुलासा करण्याची मागणी सावंत यांनी केली होती.


विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावले. हा केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट असून एनसीबीने त्यांच्या जावयाला अटक केल्याने नैराश्येतून हे आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर दिले.

Related Stories

No stories found.