एनसीबी बॅकफूटवर! आर्यनच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात अद्याप आव्हान नाहीच

क्रूझ ड्रग्ज पार्टी तपासावरच उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
एनसीबी बॅकफूटवर! आर्यनच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात अद्याप आव्हान नाहीच
Aryan khanSarkarnama

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांना उच्च न्यायालयाने (High Court) जामीन दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. यामुळे अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) अडचणीत आले आहेत. आता या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय एनसीबीने अद्याप घेतलेला नाही.

आर्यनला जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जावे की नाही, अशी द्विधा अवस्था एनसीबीची झाली आहे. यासाठी एनसीबी कायदेशीर सल्लाही घेत आहे. उच्च न्यायालयाने तपासावरच ताशेरे ओढल्याने सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत अद्याप एनसीबी अधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाबाबत काही भाष्य केल्यास एनसीबीच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आर्यन, मुनमुन आणि अरबाझ यांच्या जामिनाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशात एनसीबीकडे कोणतेही पुरावे नसल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. आदेशात म्हटले आहे की, आर्यन, अरबाझ आणि मुनमुन यांच्या विरोधात त्यांनी अमली पदार्थांसाठी कट आखल्याचे कोणेतेही पुरावे नाहीत. याचबरोबर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही काही आक्षेपार्ह आढळलेले नाही. या आरोपींनी समान हेतू ठेवून बेकायदा कृत्य केल्याचा एकही पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. ते तिघे एका क्रूझमधून प्रवास करीत होते म्हणून त्यांना कटाचा भाग ठरवणे शक्य नाही. तसेच, तिघांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे संबंधित वेळी त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते हेसुद्धा स्पष्ट होत नाही.

Aryan khan
पायलट यांनी केली हाय कमांडची दिशाभूल! नेत्याचा खळबळजनक आरोप

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात होता. आर्यनसह तिघांच्या जामिनावर तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. आर्यनच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार असल्याचे सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. अखेर 30 ऑक्टोबरला आर्यनची कारागृहातून सुटका झाली होती. मुनमुन आणि अरबाझ यांची 31 ऑक्टोबरला कारागृहातून सुटका झाली होती.

Aryan khan
ममतांचा दे धक्का! राहुल गांधींचे निकटवर्ती माजी खासदार करणार तृणमूलमध्ये प्रवेश

उच्च न्यायालयात सलग तीन दिवस आर्यनसह तिघांच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर तिघांची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आर्यन आणि अरबाझ हे आर्थर रोड कारागृहात तर मुनमुन भायखळा महिला कारागृहात होता. न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर 2 दिवसांनी आर्यनची तर मुनमुन आणि अरबाझची 3 दिवसांनी सुटका झाली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in