वानखेडेंची धावपळ अन् चौकशी; कायद्यात तुरूंगावासाची तरतूद

वानखेडे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.
Sameer Wankhede
Sameer Wankhede sarkarnama

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drug Case) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या आरोपानंतर या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने (Prabhakar Sail) अनेक गंभीर खुलासे केले आहेत. त्यानंतर वानखेडे यांची आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ही धावपळ उगाचच नसून एनडीपीएस कायद्यातील कठोर तरतुदी त्यामागचं कारण असल्याचं बोललं जात आहे.

प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत आपल्यावर कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर एनडीपीएस न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. सोमवारी रात्री त्यांनी दिल्लीही गाठली. एनसीबीच्या दक्षता समितीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत असल्याने वानखेडे यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत.

Sameer Wankhede
वानखेडे आल्यापासून एनसीबीतील चार अधिकारी निलंबित!

वानखेडे यांनी बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल केल्याचा आरोप मलिकांकडून केला जात आहे. तसेच प्रभाकर यानेही आपल्या कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचे तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी शाहरूख कडून पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार एखाद्या अधिकाऱ्याकडून कायद्याचा गैरवापर झाल्यास त्यांना सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत तुरूंगावासाच्या शिक्षा होऊ शकते.

ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनीही एनडीपीएस कायद्यातील तरतुदींबाबत सांगताना वानखेडे यांच्या धावपळीवर भाष्य केलं आहे. वानखेडेंची ही धावपळ उगाचच नसून कायद्यातील तरतुदीनुसार अधिकाऱ्यांना अटक होऊन शिक्षाही होऊ शकते, असे त्यांनी म्हटलं आहे.

Sameer Wankhede
एनसीबी अधिकाऱ्याचं पत्र उघड; शहांना सांगून राकेश अस्थानांनी वानखेडेंना एनसीबीत आणलं!

एनडीपीएस कायद्यातील तरतुदी काय आहेत?

कायद्यातील कलम 58 मध्ये अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली किंवा चुकीच्या पध्दतीने कारवाई केल्याची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कलम 58 (क) नुसार अधिकार प्रदान करण्यात आलेली व्यक्ती संशयास वाजवी कारण नसताना कोणतीही इमारत, वाहन किंवा ठिकाण यामध्ये प्रवेश अथाव तपास करील.

कलम 58 (ख) नुसार, जप्तीपात्र असे कोणतेही अंमली औषधीद्रव्य किंवा मन:प्रभावी पदार्थ किंवा अन्य वस्तू ताब्यात घेण्याच्या किंवा तिचा तपास करण्याच्या बहाण्याने अथवा ताब्यात घेण्यास पात्र असणारा कोणताही दस्तऐवज किंवा इतर वस्तू ताब्यात घेण्याच्या बहाण्याने, कोण्यातही व्यक्तीची संपत्ती तापदायकरीत्या व विनाकारण सक्तीने ताब्यात घेईल.

कलम 58 (ग) नुसार, कोणत्याही व्यक्तीला तापदायकरीत्या व विनाकारण स्थानबध्द करीत तिची झडती घेईल किंवा तिला अटक करील, त्या व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा एक हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

कलम 58 (2) नुसार जाणीवपूर्वक आणि दुर्भावपूर्वक खोटी माहिती देणारी आणि त्याद्वारे या कायद्यान्वये अटक किंवा झडती घडवून आणणारी कोणतीही व्यक्ती, दोन वर्षांपर्यंत असू शकेल अशा मुदतीच्या कारावासाच्या किंवा द्रव्यदंडाच्या किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com