रिया चक्रवर्तीनेच गांजा खरेदी करुन सुशांतला दिला ; एनसीबीचा आरोप

ड्रग्जसाठी शौविकनेच रियाला पैसे देण्यास सांगितले.
Riya Chakraborty News, Sushant Singh Rajput case news
Riya Chakraborty News, Sushant Singh Rajput case newssarkarnama

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या (riya chakraborty) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी)अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केला आहे. (Sushant Singh Rajput case news update)

या प्रकरणात एनसीबीनं (ncb) मंगळवारी आरोपपत्राचा मसुदा सादर केला आहे. यात रिया व अन्य दोन आरोपींवर एनसीबीनं गंभीर आरोप केले आहेत. लवकरच रियासह अन्य आरोपींवर आरोपनिश्चितीची प्रक्रिया होणार आहेत.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील कथित ड्रग्ज वापराबाबत एनसीबीने तपास सुरु केला आहे. रिया, तिचा भाऊ शौविक याच्यासह ३५ जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज प्रकरण हे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडलेले आहे, असा दावाही एनसीबीने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात रिया चक्रवर्तीसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयात न्यायमूर्ती व्ही. जी. रघुवंशी यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 27 जुलैची तारीख निश्चित केली आहे.

रिया आणि तिचा भाऊ शौविक यांनी इतर आरोपींकडून अनेकदा गांजा खरेदी करुन तो सुशांतला दिला होता. उच्चभ्रू सोसायटी आणि बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांचे वितरण, विक्री आणि खरेदी करण्यासाठी सर्व आरोपींनी मार्च 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान गुन्हेगारी कट रचला होता, असा दावा या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. एका महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाचा जामीन मंजूर केला होता.

Riya Chakraborty News, Sushant Singh Rajput case news
एकनिष्ठा हीच गुरुदक्षिणा ; राऊतांचा शिंदेंना टोला, म्हणाले, बाळासाहेब हयात असते तर..

एनसीबीने म्हटले आहे की..

  • रियाने सुशांतच्या घराचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, घरातील कर्मचारी दीपेश सावंत आणि इतरांकडून गांजा खरेदी केला.

  • आरोपींनी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी पैसे पुरवले होते. यात गांजा, चरस, कोकेन आणि इतर अंमली पदार्थांचा समावेश होता.

  • रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक अमली पदार्थ तस्करांच्या नियमित संपर्कात होता. ड्रग्जसाठी शौविकनेच रियाला पैसे देण्यास सांगितले.

  • आरोपींवर कलम 27 आणि 27 अ, 28, 29 यासह एनडीपीएस कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com