नवाब मलिक यांना एनसीबीचा दणका; जावयाच्या अडचणीत वाढ

मलिक यांचे जावई समीर खानला ड्रग प्रकरणात एनसीबीने जानेवारी महिन्यात अटक केली होती.
नवाब मलिक यांना एनसीबीचा दणका; जावयाच्या अडचणीत वाढ
sameer wankhede,nawab maliksarkarnama

मुंबई : अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागासह (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सतत निशाणा साधणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनसीबीने मलिक यांच्या जामीनाविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. जामीन रद्द करण्यासाठी एनसीबीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मलिक यांचे जावई समीर खानला ड्रग प्रकरणात एनसीबीने जानेवारी महिन्यात अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला आहे. पण समीर खानला चुकीच्या पध्दतीने अडकवल्याचे सांगत मलिक यांनी काही घटनांचे दाखले दिले आहेत. त्यावरून जावयाला एनसीबीने गोवल्याचे सिध्द होते, असा दावा मलिक यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

sameer wankhede,nawab malik
नवाब मलिक एनसीबीला अडचणीत आणणार; वकील लागले कामाला

समीर विरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. त्यासाठी वकीलांनी तयारी सुरू केल्याची माहिती मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पण त्यापूर्वीच एनसीबीने जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे एनसीबीने मलिक यांना दणका दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या जावयाच्या अडचणीही आता वाढल्या आहेत.

sameer wankhede,nawab malik
NCBला गांजा अन् तंबाखू यांच्यातील फरक समजत नाही ; मलिकांचा खोचक टोला

दरम्यान, मलिक यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत एनसीबीला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्याते उभे केले. मागील काही दिवसांपासून मलिक यांच्याकडून सातत्याने एनसीबी व वानखेडे यांना लक्ष्य केलं जात आहे. केवळ प्रसिध्दीसाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. गुरूवारी त्यांनी जावई समीर खान यालाही एनसीबीने अशाच पध्दतीने अडकवल्याचा आरोप केला आहे.

एनसीबीने जावयावर केलेल्या कारवाईदरम्यान आम्ही कधीच तो निर्दोष असल्याचा दावा केला नाही. आम्ही कायदा मोठा असल्याचे म्हटले, असे मलिक यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी एनसीबीने मलिक यांच्या जावयाला अटक केल्याने ते एनसीबीविरोधात बोलत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर मलिक यांनी गुरूवारी जावयाला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.