बॉलीवूडला धक्का! आणखी एक अभिनेता अडकला एनसीबीच्या जाळ्यात

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. आता यात आणखी एक अभिनेता अडकला आहे.
ncb arrests bollywood actor ajaz khan in connection with batata gang
ncb arrests bollywood actor ajaz khan in connection with batata gang

मुंबई : बॉलीवूडमधील बड्या हस्तींना अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या शादाब बटाटा याला केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) दोन कोटींच्या अमली पदार्थांसह अटक केली होती. बटाटाच्या संपर्कातील अभिनेता एजाज खान याला आज एनसीबीने अटक केली. यामुळे खळबळ उडाली आहे. त्याची न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडीत रवानगी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूडमधील अमली पदार्थांचे रॅकेट समोर येण्याची शक्‍यता आहे.   

शादाब बटाटा हा ड्रग तस्कर फारूक बटाटाचा मुलगा आहे. त्याच्या संपर्कात एजाज खान होता. एजाज खानला आज एनसीबीने विमानतळावर ताब्यात घेतले. त्यानंतर एनसीबीने अनेक ठिकाणी छापे घातले. शादाब हा अनेक वर्षांपासून मुंबई आणि देशभरातील अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंधित आहे. तसेच, बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना तो अमली पदार्थ पुरवत असल्याचे तपासात समोर आले. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. यानंतर अनेक सेलिब्रिटींची नावे या प्रकरणात चर्चा आली होती. अमली पदार्थांचे धागेदोरे अनेक सेलिब्रिटींपर्यंत पोचल्यानंतर एनसीबीने अधिक कडक कारवाई सुरू केली. यात शादाब हा एनसीबीच्या जाळ्यात अडकला होता. लोखंडवाला, वर्सोवा आणि मिरा रोड परिसरात केलेल्या कारवाईत दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच, काही महागड्या गाड्या, एक नोटा मोजण्याचे मशीनही सापडले होते. 

दाऊदच्या हस्तकाच्या भागातही कारवाई 
एनसीबीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाण याच्या डोंगरी आणि नागपाडा भागातही कारवाई केली. अभिनेता एजाज खान हा शादाबच्या संपर्कात असल्याचे समोर आले. त्यानंतर तो राजस्थानवरून मुंबईत येताच विमातळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. शादाबला तस्करीत तो मदत करत असल्याचा एनसीबीचा संशय आहे.

एजाज खान आहे कोण?
अभिनेता एजाज खानने रक्तचरित्र, अल्लाह के बंदे आदींसह अनेक चित्रपटात काम केले आहे. रहे तेरा आशीर्वाद, कहानी हमारे महाभारत की, करम अपना अपना या मालिकांमधील त्याच्या भूमिकाही गाजल्या आहेत. बिग बॉसच्या सातव्या भागात तो वादग्रस्त  ठरला होता. फिअर फॅक्‍टर- खतरों के खिलाडी आणि कॉमेडी नाईट्‌स वुईथ कपिल या कार्यक्रमांमध्येही तो सहभागी झाला होता. एक्स्टसी टॅबलेट्‌सच्या रुपाने ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी त्याला ऑक्‍टोबर 2018 मध्ये अटक झाली होती. तसेच, जुलै 2019 मध्ये धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com