मलिकांच्या जामीनासाठी मुलाकडे मागितले तीन कोटी रुपये!

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे सध्या मनी लाँर्डिंग प्रकरणात तुरूंगात आहे.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या मनी लाँर्डिंग प्रकरणात तुरूंगात आहे. त्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला आहे. त्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मलिकांच्या जामीनासाठी तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांचा मुलगा आमिर (Amir Malik) याने मुंबईतील विनोबा भावे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार इम्पियाज नावाच्या व्यक्तीविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्पियाज याने मलिकांना जामीन मिळवून देण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी फोनवरून केल्याचे आमिर यांनी तक्रारीत म्हटले आहे. हे बिटकॉईन (Bitcoin) स्वरूपात मागितले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. हा फोन दुबईतून आला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. (Nawab Malik News)

मलिकांच्या जामीनासाठी दुबईतून कुणी फोन केला, यावरून आता चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून मलिकांचे अंडरवर्ल्ड आणि दाऊदशी संबंध असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दाऊदच्या दबावाखाली महाविकास आघाडी सरकार काम करत असल्याचे आरोपही केले जात आहेत. अटक झाल्यापासून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

मुलगा फराज मलिकला ईडीचे समन्स

नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना मंगळवारी (१५ मार्च) ईडीने (ED) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते, मात्र फराज मलिक मंगळवारी हजर झाले नाहीत. फराज मलिक (Faraz Malik) याला समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे, पण मंगळवारी​ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत. कुर्ला परिसरात असलेल्या गोवाला बिल्डिंग कंपाऊंडच्या डील आणि पेमेंटबाबत ईडीला फराजची चौकशी करायची आहे. यापूर्वी ईडीने फराजला समन्स बजावल्यानंतर फराजने आपले वकील पाठवून एक आठवड्याचा वेळ मागितला होता, मात्र ईडीने वेळ देण्यास नकार दिला होता.

मलिकांची याचिका फेटाळली

ईडीची कारवाई कायदेशीरच असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांची याचिका फेटाळून लावली आहे. ईडीने आपल्याला केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिक यांनी इडीच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. आपल्याला झालेली अटक ही कायद्याला धरुन नसल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मलिक यांची याचिका फेटाळून लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com