तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावला; नवाब मलिकांचा पलटवार

कॉंग्रेसमुळे (Congress) पहिल्या लाटेत कोरोना पसरला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला होता
Nawab Malik News Updates
Nawab Malik News Updates

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर कोरोना पसरवण्याचा आरोप केला. 'कोरोना हे जागतिक संकट होते. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेत काँग्रेसने मोठ्या प्रमाणात राजकारण केले. महाराष्ट्र सरकारवरील कोरोनाचा (Corona) ताण कमी करण्यासाठी मुंबईमध्ये काँग्रेसने मोफत तिकिटे वाटली. त्यामुळे इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले, असा आरोप सोमवारी (७ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेत केला. (Nawab Malik News Updates)

त्यांच्या या आरोपाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टीकास्त्र डागले आहे. कोरोना काळात राज्यसरकार मजुरांसोबत, गरीबांसोबत उभे राहिले. पण तुम्ही विचार न करता जनतेवर लॉकडाऊन लादले. नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला. ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, अशी घणाघाती टीका मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

Nawab Malik News Updates
किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील आरोपी पुणे पोलिसांसमोर हजर

मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले. कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर पायी जात असताना महाराष्ट्र सरकारने त्यांची सर्व व्यवस्था केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तर प्रदेश व बिहारचे मजुर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बसेसही चालवल्या, परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळया वाजवायला लावल्या, त्याचा परिणाम जनता आजही भोगत आहेत, अशी घणाघाती टीकाही यावेळी नवाब मलिक यांनी केली.

महाराष्ट्र सरकारने जेव्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना पसरणार नसल्याचे सांगितले. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले, ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात कोरोना पसरला, असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com