नवाब मलिकांनी मध्यरात्री टाकलेल्या ट्विटबॉम्बने एनसीबीसह भाजप अडचणीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मध्यरात्रीच एक व्हिडीओ ट्विट करुन एनसीबीसह भाजपला अडचणीत आणले आहे.
Manish Bhanushali and KIran Gosavi
Manish Bhanushali and KIran Gosavi

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (NCB) कामकाजावर आक्षेप घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच, अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करतेवेळी भाजपशी (BJP) संबंधित दोन व्यक्ती उपस्थित होत्या, असा दावा त्यांनी केला आहे. आता त्यांनी मध्यरात्रीच एक व्हिडीओ ट्विट करुन एनसीबीसह भाजपला अडचणीत आणले आहे.

मलिक यांनी मध्यरात्री एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात भाजपचा पदाधिकारी मनीष भानुशाली आणि खासगी गुप्तहेर के.पी.गोसावी हे दोघे क्रूझवरील छाप्याआधीच एनसीबीच्या कार्यालयात जाताना दिसत आहेत. म्हणजे त्यांना आधीच या छाप्याबद्दल माहिती होती, असे दिसत आहे. याचबरोबर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या म्हणण्यातील विसंगतीवरही मलिक यांनी बोट ठेवले आहे. मलिक यांच्या या व्हिडीओमुळे एनसीबी आणि भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. भानुशाली हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा इन्कारही करण्यात आलेला नाही.

मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरही हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले आहे की, काल समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत 8 ते 10 जणांना अटक करण्यात आली, असे म्हटले होते. प्रत्यक्षात 8 जणांना अटक करण्यात आली आहे. किती जणांना अटक करण्यात आली याची खात्रीशीर माहितीही वानखेडे देऊ शकले नाहीत. आणखी दोघांना या प्रकरणात अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का?

Manish Bhanushali and KIran Gosavi
महागाईच्या आगीत ओतलं तेल; पेट्रोल, डिझेल दरवाढीची हॅटट्रिक!

दरम्यान, मलिक यांनी काल (ता.६) आरोप केल्यानंतर एनसीबीचे महासंचालक ग्यानेश्वरसिंह आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेतली. मलिक यांनी भाजप पदाधिकारी आणि खासगी गुप्तहेर असल्याचा आरोप केलेले दोघे या प्रकरणात पंच आहेत, अशी कबुली एनसीबीने दिली आहे. ते म्हणाले होते की, आमच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. सर्व आरोप हे पूर्वग्रहदूषित आहेत. या प्रकरणात 10 पंच होते. या प्रकरणातील आरोपी आणि आरोप करणारे हे न्यायालयात जाण्यास जाऊ शकतात. आम्ही योग्य प्रक्रियेचे पालन केले असून, याचे उत्तर आम्ही न्यायालयात देऊ.

Manish Bhanushali and KIran Gosavi
राकेश झुनझुनवालांसमोर पंतप्रधान मोदी हात बांधून उभे राहतात तेव्हा...

या प्रकरणात एनसीबीने प्रभाकर साईल, किरण गोसावी (के पी गोसावी), मनीष भानुशाली, औब्रे गोमेझ, आदिल उस्मानी, व्ही. वैगणकर, अपर्णा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैझ, मुझमिल इब्राहिम हे दहा जण पंच होते. यातील गोसावी आणि भानुशाली हे भाजपचे पदाधिकारी असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. भानुशाली याचे भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसोबतचे फोटोही मलिक यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे दाखवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com