वानखेडेंनी पहिल्या पत्नीच्या नातेवाईकालाच अडकवलं! मलिकांचा नवा गौप्यस्फोट

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे अडचणीत आले आहेत.
Sameer Wankhede and Nawab Malik
Sameer Wankhede and Nawab Maliksarkarnama

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. या प्रकरणी मलिक यांनी आणखी मोठा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे.

मलिक यांनी आज पुन्हा वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. मलिक यांनी म्हटले आहे की, समीर वानखेडेंना भीती होती की त्यांची पहिली पत्नी त्यांच्या विरोधात बोलेल. म्हणून एका ड्रग्ज विक्रेत्याच्या मदतीने त्यांनी पहिल्या पत्नीच्या नातेवाईकाला राज्य पोलिसांच्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागामार्फत अटक केली. माझ्या विरोधात बोलल्यास संपूर्ण कुटुंबालाच ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकवेन, अशी धमकी वानखेडे यांनी दिली होती.

समीर वानखेडे यांची पहिली पत्नी शबाना कुरेशी या आतापर्यंत काहीही बोललेल्या नाहीत. परंतु, त्यांचे वडील डॉ.झाहिद कुरेश यांनी मात्र, खुलासा केला आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब मुस्लिम असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपल्या मुलीचा विवाहावेळी समीर वानखेडे मुस्लिम धर्माचे पालन करीत होते, असाही दावा त्यांनी केला होता. वानखेडेंना सरकारी नोकरी पहिल्या विवाहाच्या नंतर लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मलिक यांनी उच्च न्यायालयात आणखी कागदपत्रे सादर केली आहेत. मलिक यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केले असून, त्यात समीर वानखेडे यांचा शाळा प्रवेशाचा अर्ज आणि प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखलाही आहे. या दोन्ही कागदपत्रांमध्ये वानखेडे हे मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे.

Sameer Wankhede and Nawab Malik
भाजपच्या 65 आमदारांना घेऊन विरोधी पक्षनेते गेले अन् थेट माफी मागून आले!

वानखेडे यांनी नुकतीच दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली होते. वानखेडे यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे आयोगासमोर सादर केली आहेत. यानंतर बोलताना आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला म्हणाले होते की, समीर वानखेडे यांनी आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी महाराष्ट्र सरकार करणार आहे. ही कागदपत्रे वैध आढळल्यास त्याआधारे त्यांच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही.

Sameer Wankhede and Nawab Malik
कंगनाच्या वक्तव्यावर थरूर म्हणाले, बंदूक घेऊन गोळ्या घालायला जाण्यापेक्षा...

समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला होता. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी नुकतीच राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी हलदर यांच्याकडे एक अर्जही केला होता. यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना लगेचच क्लिनचिट दिली होती. हलदर म्हणाले होते की, मी त्यांची तक्रार पाहिली आहे. मला वाटते की ते अनुसूचित जातीमधील असावेत. धर्मांतर केल्याचे सर्व आरोप वानखेडेंनी फेटाळून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com