नवाब मलिक एनसीबीला अडचणीत आणणार; वकील लागले कामाला

नवाब मलिक यांनी गुरूवारी पुन्हा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला.
sameer wankhede,nawab malik
sameer wankhede,nawab maliksarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गुरूवारी पुन्हा एकदा अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागासह (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधला. जावई समीर खानला (Sameer Khan) ड्रग प्रकरणात चुकीच्या पध्दतीने अडकवल्याचे सांगत मलिक यांनी काही घटनांचे दाखले दिले आहेत. त्यावरून जावयाला एनसीबीने गोवल्याचे सिध्द होते, असा दावा मलिक यांनी केला आहे.

मलिक यांनी पत्रकार परिषदेत एनसीबीला पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्याते उभे केले. मागील काही दिवसांपासून मलिक यांच्याकडून सातत्याने एनसीबी व वानखेडे यांना लक्ष्य केलं जात आहे. केवळ प्रसिध्दीसाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. गुरूवारी त्यांनी जावई समीर खान यालाही एनसीबीने अशाच पध्दतीने अडकवल्याचा आरोप केला आहे.

विशेष न्यायालयातील माहितीच्या आधारे मलिक यांनी हा आरोप केला आहे. आता त्याच माहितीवरून समीर खान यांनी एनसीबीविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. त्यासाठी वकीलांनी तयारी सुरू केल्याची माहिती मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

एनसीबीने जावयावर केलेल्या कारवाईदरम्यान आम्ही कधीच तो निर्दोष असल्याचा दावा केला नाही. आम्ही कायदा मोठा असल्याचे म्हटले, असे मलिक यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी एनसीबीने मलिक यांच्या जावयाला अटक केल्याने ते एनसीबीविरोधात बोलत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर मलिक यांनी गुरूवारी जावयाला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे सांगितले.

नवाब मलिक म्हणाले की, माझा जावई ड्रग्ज प्रकरणी साडेआठ महिने कारागृहात होता. त्यामुळे आमच्या कुटुबियांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यामुळे माझी मुलगी, तिचे दोन मुले यांच्यावर त्याचा परिणाम झाला. या काळात ती कुटुंबियाशिवाय कुणाच्याही संपर्कात नव्हती. कोर्टाचा आदेश आला असून यात 200 किलो गांजा सापडला नाही, तर एका महिलेकडे साडेसात ग्रॅम गांजा सापडला आहे. बाकीचे हर्बल तंबाखू आहे. मग NCB एवढी मोठी एजन्सी आहे, तिला तंबाखू आणि गांजा मध्ये फरक समजत नाही, असा टोला मलिक यांनी एनसीबीला लगावला.

'ता. 3 जानेवारी माझ्या जावयाला अटक झाली. तेव्हा मी म्हणालो होतो कायद्या अन् न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. पण भाजप नेते सगळ्या चॅनेल वर सांगत होते नवाब मलिक यांचा जावई ड्रग डीलर आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी पण आरोप केले. पण 27 तारखेला NDPS च्या स्पेशल कोर्टाने माझा जावई समीर खान आणि इतर दोन आरोपींना जामीन दिला. कोर्ट ऑर्डर मध्ये माझं नाव घेऊन बातम्या चालल्या. माझ्या जावायाबाबत बातम्या पेरण्यात आल्या. माझी मुलगी तिच्या दोन्ही मुलांवर त्याचा परिणाम झाला. मुलं समाजात बाहेर जायला तयार नव्हती, असे मलिक यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com