मोदी सरकार सात वर्षात पहिल्यांदाच झुकलं!

तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा...
मोदी सरकार सात वर्षात पहिल्यांदाच झुकलं!
Narendra ModiSarkarnama

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी सकाळी मोठी घोषणा केली आहे. मागील वर्षांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मोदींनी तीनही कायदे मागे घेण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन करत मोदी सरकार सात वर्षात पहिल्यांदाच झुकल्याचं म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर मलिक यांनी लगेचच पत्रकार परिषद घेतली. मलिक म्हणाले, तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा मोदींनी केली आहे. मी सर्व आंदोलनकारी शेतकऱ्यांचे ज्यांच्यावर लाठ्या चालवण्यात आल्या, खलिस्तानी, आंतकवादी म्हटले, त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी मोदी सरकारला सात वर्षात पहिल्यांदाच झुकवलं आहे. यातून देशात मोठा संदेश गेला. देश एकजूट झाला तर कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो. आम्ही हेच आधीपासून सांगत होतो.

Narendra Modi
कर्मचाऱ्यांनी माघार न घेतल्यास अनिल परबांचा 'प्लॅन बी' तयार

सरकारला कायदा बनवण्याचा अधिकार आहे, तर तो परत घेण्याचाही अधिकार आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्याने स्पष्ट त्यात होत होते की, भाजपचा पराभव होत होता. त्यामुळे हे कायदे मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. ज्यांचे प्राण गेले, त्यांना अभिवादन करतो. ज्याप्रकारे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना मारले, ते निषेधार्ह होते. पण कोणतीही लढाई जिंकण्यासाठी शहीद व्हावे लागते. अशा अनेक लढाया देशाने पाहिल्या आहेत, असे मलिक म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना सुरूवातीला शेतकऱ्यांविषयी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या. माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत, अनेक सुविधा दिल्या. कृषी बजेट पहिल्यापेक्षा पाच पट वाढवलं चार वर्षात १लाख कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मदत केली, असे मोदींनी सांगितलं.

मोदी म्हणाले, १० कोटी पेक्षा अधिक शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी ३ कायदे केले होते. १ लाख ६४ हजार कोटी रुपयांचा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in