वानखेडेंचे षडयंत्र...आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलालाही अडकवलं! मलिकांचा दावा

झैद राणा या युवकाने केलेत आरोप...
वानखेडेंचे षडयंत्र...आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलालाही अडकवलं! मलिकांचा दावा
Sameer WankhedeSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील आरोप सुरूच ठेवले आहेत. वानखेडे यांनी षडयंत्र रचून एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलालाही खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा नवा आरोप मलिकांनी केला आहे. दरम्यान, झैद राणा (Zaid Rana) या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने वानखेडेंवर असाच आरोप केला आहे. याबाबत त्याने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. याच प्रकरणाशी आयपीएस अधिकाऱ्याचे कनेक्शन मलिकांनी जोडले आहे.

झैद राणा या 20 वर्षीय युवकाला एप्रिल महिन्यात एनसीबीने अटक केली आहे. राणाने उच्च न्यायालायत जामीनासाठी केलेल्या याचिकेमध्ये वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. वैयक्तिक भांडणाचा राग मनात धरून त्यांनी आपल्याचा अटक केल्याचा दावा राणाने केला आहे. वानखेडे यांनी षडयंत्र रचून घरात अमली पदार्थ ठेवले अन् त्यात अडकवल्याचा आरोप राणाने या याचिकेत केला आहे.

Sameer Wankhede
मलिकांनी सांगितलं...1993 मध्ये कागदपत्रे बदलली पण इथं वानखेडे फसले!

राणाच्या प्रकरणात एनसीबीने दावा केला आहे की, त्याच्या घरात 1.32 ग्रॅम एलएसडी, 22 ग्रॅम गांजा आणि भांग जप्त करण्यात आली आहे. राणाच्या म्हणण्यानुसार, वानखेडे यांच्यामार्फत हे अमली पदार्थ स्कूटर आणि इतर ठिकाणी ठेवण्यात आले होते. राणा हा अंधेरीतील समीर वानखेडे यांच्या घराशेजारी राहतो. वानखेडेंनी त्यांचे घर भाड्याने दिले होते. भाडेकरू आणि राणाच्या आई-वडिलांचे वाद झाले होते. याच कारणास्तव वानखेडे यांनी राणाला अडकवल्याचा दावा त्याचे वकिल अशोक सारंगी यांनी न्यायालयात केला आहे.

राणा याने संबंधित इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी जामीन याचिकेत केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वत: वानखेडे घरी आले होते. आरोपपत्रामध्ये ते घरी आल्याचा कुठेच उल्लेख नाही, असे याचिकेत म्हटले आहे. यावर न्यायालयाने 20 नोव्हेंबरपर्यंत एनसीबीला आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Sameer Wankhede
वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद अन् धर्म मुस्लिमच? शाळेचे दाखले व्हायरल

मागील सात महिन्यांपासून राणा काय करत होता. आतापर्यंत त्याने तक्रार का केली नाही, असे सवाल वानखेडे यांनी उपस्थित केले आहेत. याविषयी न्यायालयात म्हणणे सादर केले जाईल, असेही वानखेडे म्हणाले. दरम्यान, वानकेडे यांचे वडील ज्ञानदेवे वानखेडे यांनी मलिकांविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर आज दुपारी 2.15 वाजता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये मलिकांना ट्विट करण्यास किंवा बोलण्यास बंदी घालण्याच्या मागणीवर निर्णय दिला जाऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.