Nawab Malik
Nawab MalikSarkarnama

NCP National Executive : नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून डच्चू

nawab malik : मनी लॉड्रिंग प्रकरणात गजाआड असलेल्या नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्य प्रवक्ते पदावरून दूर केले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP)दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांना नव्या कार्यकारिणी स्थान देण्यात आलं आहे, मात्र मनी लॉड्रिंग प्रकरणात गजाआड असलेल्या नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्य प्रवक्ते पदावरून दूर केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीने आपल्या राष्ट्रीय कार्यकारणीतून नवाब मलिक यांना डच्चू दिला आहे.

नव्या कार्यकारणीत नवाब मलिक यांना राष्ट्रवादीनं स्थान दिलेले नाही. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदी बढती दिली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात नवाब मलिक सध्या कारागृहात आहेत.

Nawab Malik
Bachchu Kadu : मी मंत्री बनणारच, तो माझा अधिकार ; नाराज आमदार बच्चू कडू यांचं मोठं विधान

नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यांना अटक केल्यानंतरही राष्ट्रवादीने त्यांचे मंत्रिपद कायम ठेवले होते. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतरही राष्ट्रवादी आपल्या निर्णयावर कायम होते. राज्यात सत्ताबदल होताच राष्ट्रवादीनं सावध भूमिका घेत मलिक यांना नव्या कार्यकारणीपासून दूर ठेवलं आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्ष संघटना, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक, किसान सेलची जबाबदारी तर नरेंद्र वर्मा यांच्यावर मीडिया आणि आयटी व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कामगार, एससी, एसटी व सहकार या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in