धक्कादायक : वानखेडेंची आई हिंदू की मुस्लिम, मृत्यूचे दोन दाखले

समीर वानखडे (Sameer Wankhede) यांच्या आई झायदा वानखडे यांच्या मृत्यूनंतर त्यांना ओशिवरा कब्रस्तान इथे दफन करण्यात आले होते.


धक्कादायक : वानखेडेंची आई हिंदू की मुस्लिम, मृत्यूचे दोन दाखले
Sameer Wankhede sarkarnama

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला असतानाच समीर यांची आई झायदा यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मलिक यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे. त्यामुळे झायदा हिंदु की मुस्लिम आहेत, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

समीर वानखडे (Sameer Wankhede) यांच्या आई झायदा वानखडे यांच्या मृत्यूनंतर त्यांना ओशिवरा कब्रस्तान इथे दफन करण्यात आले होते. त्यासाठी त्या मुस्लिम असल्याचे प्रमाणपत्र कब्रस्तान इथे सादर करण्यात आले होते. दफनविधीसाठी 16 एप्रिल रोजी मुस्लिम असल्याचे प्रमाणपत्र दिले, आणि महापालिकेत मृत्यूची नोंद 17 एप्रिल रोजी करताना झायदा वानखडे हिंदू असल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे एक दिवसापूर्वी झायदा वानखडे मुस्लिम असल्याची नोंद आणि एक दिवसानंतर हिंदू असल्याची नोंद केल्याचे उघड झाले आहे.

''मी हिंदू महार आहेत आणि माझी पत्नी झायदा ही मुस्लिम होती पण आम्ही त्यांनी हिंदू पद्धतीनुसार लग्न केलं. लग्नानंतर झायदा हिंदू धर्मात समाविष्ट झाली,'' असे ज्ञानदेव वानखेडेंनी न्यायालयात सांगितलं होतं. ''नवाब मलिकांनी केलेले दावे त्यांनी सिद्ध करून दाखवावेत,'' असा युक्तीवाद वानखेडेंच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

Sameer Wankhede
अधिवेशनाच्या संभ्रमात विधिमंडळ कर्मचारी भरतीप्रक्रिया रखडली

''फोटोकॉपीचा आधार घेत नवाब मलिक यांनी जे दावे केले ते पूर्ण चुकीचे आहेत,'' असे ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी न्यायालयास सांगितले. ज्ञानदेव वानखेडे यांनी स्वतःच आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळेचे गुणपत्रक, पोलिस सेवेत असतानाचे कागदपत्र व अन्य पुरावे न्यायालयासमोर दाखल केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in