Nawab Malik : मलिकांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब : किडनी निकामी झाल्याची वकीलांची माहिती..

Nawab Malik : पुढच्या सुनावणीत जामीन मिळेल का?
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama

Nawab Malik : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आमदार व माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान मलिक हे गंभीररीत्या आजारी असून, त्यांची एक किडनी निकामी झाली असल्याचे न्यायालयाला सांगितले आहे.

मलिक यांनी ईडीने केलेल्या अटके विरोधात जामिनासाठी अर्ज केला आहे. तसेच मलिक हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे, त्यांच्या वकीसांकडून करण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती मलिकांच्या वतीने वकिलांनी न्यायालयात केली. त्यानुसार आज सुनावणी होती, परंतु आता ही सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Nawab Malik
Nawab Malik News: नवाब मलिकांच्या अर्जावर आज सुनावणी : जामीन मिळणार?

नवाब मलिकांचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितली की, मलिक यांची प्रकृती गंभीर असून, त्यांची एक किडनी निकामी झाली आहे. देसाई यांनी जे जे हॉस्पिटलचा अहवाल ही न्यायालयाला सादर केला आहे. कोठडीतल्या कालावधीत त्यांची किडनी निकामी झाली असून, त्यांच्या आऱोग्याच्या विचार करून, जामीन मंजूर करावा अशी मागणी देसाई यांनी केली. मात्र न्यायालयाने ही सुनावणी उद्यापर्य़ंत तहकूब केली आहे.

दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांना गेल्या वर्षी 23 फेब्रुवारीला अटक केली होती. तेव्हापासून मलिक हे तुरुंगात आहेत. मलिकांवर गंभीर आरोप असल्याचे कारण देत त्यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com