मलिकांना ७३ दिवसांपासून न्यायालयाचा दिलासा नाहीच : कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढवला

Nawab Malik | ED : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी वाढ
Navab Malik
Navab MalikSarkarnama

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेल्या मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना आज देखील कोणताही दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत २० मेपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे त्यांच्या कारागृहातील मुक्कामात आणखी १४ दिवसांची वाढ झाली आहे. यापूर्वी २२ एप्रिल रोजीही त्यांच्या कोठडीत १४ दिवसांची म्हणजेच ६ मे पर्यंत वाढ केली होती. त्यामुळे मलिक यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले होते. त्यांच्याविरोधात ईडीने न्यायालयात ५ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

दरम्यान ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण २२ वर्षांपूर्वीचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि सुर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही मलिक यांना दिलासा दिला नाही.

Navab Malik
राजकारण तापलं! डिस्चार्जनंतर राणा दाम्पत्य ठाकरे सरकारला थेट दिल्लीतून अडचणीत आणणार?

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरूध्द ही याचिका होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली होती. ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी मलिका यांची बाजू मांडली होती. १९९३ मध्ये झालेल्या घटनेसाठी २०२२ मध्ये अटक कशी केली जाऊ शकते, असा दावा सिब्बल यांनी केला होता. पण न्यायाधीश सुर्यकांत यांनी संबंधित न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करण्यास सांगत आम्ही या टप्प्यावर यात ढवळाढवळ करणार नाही, असं स्पष्ट केले होते. त्यामुळे इथेही मलिकांना दिलासा मिळाला नाही.

Navab Malik
घडामोडींना वेग : मुख्यमंत्री ठाकरे अचानक उच्च न्यायालयातील न्यायमुर्तींच्या भेटीला

दरम्यान, मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. २३ फेब्रुवारी रोजी सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. तेव्हापासून म्हणजे तब्बल ७३ दिवसांपासून ते कोठडीमध्येच आहेत. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीने गुरूवारी त्यांच्याविरोधात पाच हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com