नवाब मलिक सर्वोच्च न्यायालयात; तात्काळ सुटकेसाठी काँग्रेसचे कपिल सिब्बल मैदानात

Nawab Malik | Kapil Sibbal : तात्काळ सुटेकेसाठी उचलले पाऊल
Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering Case
Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering CaseSarkarnama

दिल्ली : राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आता स्वतःच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीची (ED) कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरीत असल्याचा आरोप करत मलिक यांनी आपली तात्काळ सुटका करावी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मलिक यांची याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली असून यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. मलिक यांच्यावतीने काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ्य वकिल कपिल सिब्बल (Kapil Sibbal) न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

दरम्यान ई़डीने अटक केल्यानंतर नवाब मलिक सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्वरित सुटकेची मागणी करणारा मलिक यांचा अंतरिम अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला आहे. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण 22 वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. यावरच त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितील आहे.

Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering Case
मुंडे भगिनी ब्रीच कँडी रुग्णालयात; 'धनंजय दादा'ची भेट घेवून केली विचारपूस

गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरा हिला मालमत्तेसाठी मलिक यांनी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. ईडीने अटक केल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडताना मलिक यांनी `नही झुकेंगे और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे` अशी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान अटकेनंतर भाजपने मलिकांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारने मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering Case
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची RSS ला अडचण : शिवसेना-भाजपमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता

मागील सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांच्या तीन मागण्या मान्य केल्या होत्या. न्यायालयीन कोठडीत बेड, गादी आणि खुर्ची देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याआधीही मलिक यांच्या तीन मागण्या न्यायालयाने मान्य केल्या होत्या. ईडीच्या कोठडीत असताना घरचे जेवण मिळावे, चौकशीदरम्यान आपल्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी आणि रोजची औषधे घेऊ द्यावीत, अशा तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. या तिन्ही मागण्यांना न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com