आर्यनला क्लिनचिट मिळताच मलिकांनी पुन्हा वानखेडेंवर साधला निशाणा

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात आर्य़न खानला क्लिनचिट दिली आहे.
आर्यनला क्लिनचिट मिळताच मलिकांनी पुन्हा वानखेडेंवर साधला निशाणा
Nawab Malik and Sameer Wankhede Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान याला क्लिनचिट देण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) आर्यनसह सहा जणांना वगळून 14 जणांविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर आता एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांची प्रतिक्रिया आली आहे.(Nawab Malik latest Marathi News)

समीर वानखेडे यांनी क्रूझवरील डॅग्ज पार्टीवर छापा टाकून आर्यन खानसह इतरांना अटक केली होती. या प्रकरणात मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. हा वानखेडे यांचा फर्जीवाडा असल्याचं सांगत त्यांनी वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचाही उल्लेख केला होता. (Nawab Malik demands action against Sameer Wankhede and his private army)

Nawab Malik and Sameer Wankhede Latest Marathi News
या तीन कारणांमुळे आर्यन सुटला; 'एनसीबी'नंच दिली कबुली

मनी लॉंर्डिंग प्रकरणात नवाब मलिकांना ईडीने अटक केली आहे. ते सध्या वैद्यकीय जामीनावर तुरूंगाबाहेर असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण त्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून याबाबतचे ट्विट करून वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हटलं आहे मलिकांच्या ट्विटमध्ये?

आता आर्य़न खानसह इतर पाच जणांना क्लिनचिट मिळाली आहे. एनसीबीकडून समीर वानखेडे, त्यांची टीम आणि प्रायव्हेट आर्मीवर कारवाई केली जाणार का, की गुन्हेगारांचं संरक्षण करणार, असा सवाल या ट्विटमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया...

आर्यनला एनसीबीने क्लिनचिट दिल्यानंतर समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला. सॉरी सॉरी म्हणत त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. मी आता एनसीबीमध्ये नाही. त्यामुळे याप्रकरणावर बोलू शकत नाही. यासाठी एनसीबी अधिकाऱ्यांशी बोला, असे वानखेडे म्हणाले आहेत.

दरम्यान, क्रूझवर एनसीबीने गेल्या वर्षी दोन ऑक्टोबर रोजी कारवाई करीत खळबळ उडवून दिली होती. याच कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळ महत्व आले होते. राजकीय क्षेत्रातही यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. एनसीबीचे मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यात आरोपाच्या फेरी झडल्या. यावरुन राजकारण पेटलं होतं.

26 दिवसांच्या कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटी शर्तीसह जामीन मंजूर केला होता. समीर वानखेडे यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात आला होता. एनसीबीच्या दिल्लीतील पथकाची नेमणुक करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in