कंगनाचा पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी : नवाब मलिक

कंगना ओव्हरडोस झाल्यासारखी काहीही बोलते, अशी टीका नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.
कंगनाचा पद्मश्री काढून घ्यावा आणि गुन्हा दाखल करुन अटक करावी : नवाब मलिक
Kangana Ranaut & Nawab MalikSarkarnama

मुंबई : कोट्यवधी भारतीयांचा आणि स्वातंत्र्यसेनानींचा अपमान करणार्‍या अभिनेत्री कंगना राणावतचा (Kangana Ranaut) केंद्रसरकारने (Central Government) पद्मश्री (Padmashri Award) पुरस्कार काढून घ्यावा आणि तीच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (ता.12) केली आहे.

Kangana Ranaut & Nawab Malik
भाजपच्या माजी मंत्र्यांनी मंदिराच्या नावाखाली शेकडो एकर जमीन बळकावली : नवाब मलिक

'१९४७ साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हते तर, ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगनाने केले होते. यावर मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

१८५७ पासून स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. लाखो स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी यांनी या देशात एक मोठा लढा निर्माण केल्याने ब्रिटिशांनी स्वतंत्र भारत करण्याची घोषणा केली, आणि १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. एवढे बलिदान असताना कंगना ही अभिनेत्री ओव्हरडोस झाल्यासारखी काहीही बोलते अशी जोरदार टीका मलिक यांनी केली आहे.

Kangana Ranaut & Nawab Malik
'आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड, श्रीमान 56'' घाबरलेत'

दरम्यान, कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक राजकीय मंडळींनी तीच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे कंगनाचा चांगलाच समाचार घेतला आहे. निलम गोऱ्हे म्हणाल्या, ''राष्ट्रपतींनी कंगना राणावत हीला नुकताच 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान केला आहे. त्यानंतर तिने अत्यंत बेजबाबदर, निराधार आणि स्वातंत्र्य योध्यांचा अपमान करणारे विधान केले. त्याचा मी निषेध करते. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असणारी त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी कंगना राणावतने 1947 च्या स्वातंत्र्य लढ्यात जीवन समर्पित करणाऱ्या योध्यांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला आहे. त्यामुळे तिचा पुरस्कार ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in