मुंबईत वानखेडे चालवतात बार; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

वयाची 18 वर्ष पूर्ण होण्याआधीच वानखेडेंच्या नावार बारचा परवाना...
मुंबईत वानखेडे चालवतात बार; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट
Sameer WankhedeSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शुक्रवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. मुंबई वानखेडे यांचा एक बार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यांची वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच परमिट रुमचा परवाना वानखेडे यांच्या नावावर घेण्यात आला होता. शासकीय अधिकारी नोकरी करत असताना व्यवसाय करू शकत नाही. आता तरी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

नवी मुंबईत सद्गुरू नावाने हा रस्टो बार आहे. याबाबत मलिकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मलिक म्हणाले, समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात होते. वाशी येथे 1997-98 मध्ये एक हॉटेल सद्गुरू सुरू करण्यात आले. त्याचा परवाना समीर वानखडे नावाने नुतणीकरण करण्यात आले. त्यावेळी वानखेडे यांचे वय 17 वर्षे 10 महिने होते. हा परवाना 2022 पर्यंत वानखडे यांच्या नावावर आहे.

Sameer Wankhede
कमी पडल्याची कबुली देत पंतप्रधान मोदींनी मागितली देशाची माफी

कमी वयाच्या मुलाच्या नावाने परवाना घेण्यात आला. 18 वर्षाच्या खालील लोकांना परवाना दिला जात नाही. शासकीय अधिकारी शासन नोकरी करत असताना व्यवसाय करू शकत नाही. हा नियमभंग आहे. आता तरी त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना अजून वाचवलं तर केंद्र आणि भाजप त्यांना वाचवत आहे, असा त्याचा अर्थ होईल, अशी टीका मलिकांनी केली.

दरम्यान, अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मुंबईतील प्राथमिक शाळेचे दोन दाखले सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या दोन्ही दाखल्यांवर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद आणि धर्म मुस्लिम असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आणि वडिलांचे नाव दाऊद असल्याचा आरोप मलिक यांनी गुरूवारी केला होता.

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मलिक यांनी बुधवारी उच्च न्यायालयात (High Court) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. वानखेडेंचा शाळेचा प्रवेश अर्ज आणि शाळा सोडल्याचा दाखला याचीही कागदपत्रे मलिक यांनी दिली आहेत. हे दाखले सोशल मीडियातही व्हायरल झाले आहेत. या दोन्ही कागदपत्रांमध्ये वानखेडे हे मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in