NCB विरुद्ध NCP दुसरा सामना जाहीर झाला...

अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) विरोधात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची दुसरी पत्रकार परिषद
NCB विरुद्ध NCP दुसरा सामना जाहीर झाला...
Nawab Maliksarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे दुसऱ्यादा अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या विरोधाक पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेचा विषयच `एनसीबीची आणखी पोलखोल (NCB)` असा ठेवला आहे. त्यामुळे ८ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते काय गौप्यस्फोट करणार, याची उत्सुकता आहे.

Nawab Malik
नवाब मलिकांच्या आरोपानं एनसीबी वादाच्या भोवऱ्यात;पाहा व्हिडिओ

मलिक यांनी सहा आॅक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन आर्यनखान याला पकडण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते गेल्याचा आरोप केला होता. तसेच या पदार्थाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही आरोप करत हा विभाग सध्या खंडणी वसूल करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. शाहरूखखान यााल अडकविण्याचा वानखेडे यांचा प्रयत्न होता, असा आरोप त्यांनी केला होता.

राष्ट्रवादीच्या आरोपांवर एनसीबीने सविस्तर उत्तर देण्याचे टाळत सर्व प्रक्रिया ही कायदेशीर मार्गाने सुरू असल्याचा दावा केला होता. भाजपने मात्र एनसीबीची बाजू घेत मलिक यांच्या जावयाविरोधात या विभागाने कारवाई केल्याने मलिक हे आगपाखड करत असल्याचा आरोप केला होता.

Nawab Malik
बॉलीवूड सेलिब्रिटींच्या पोटात गोळा आणणारे समीर वानखेडे नक्की कोण?

राज्याचे गृहखाते झाले सतर्क

राज्यात अमली पदार्थाच्या व्यवसायाचे पेव फुटल्याबद्दल भाजपने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राज्यातील व विशेषतः मुंबईतील अमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा आज मंत्रालयात आयोजित बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला. या बैठकीला अपर मुख्य सचिव गृह मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव अपील व सुरक्षा आनंद लिमये, पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था राजेंद्र सिंग, विनीत अग्रवाल, सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, मिलिंद भारंबे उपस्थित होते.

राज्यात अमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागाने कठोर धोरण स्वीकारले असून अमली पदार्थांविरोधात कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थ विरोधी कक्ष निर्माण करण्याचे निर्देश यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

Related Stories

No stories found.