भाजप नेत्यामुळं मलिक अडचणीत; न्यायालयात मागावी लागली माफी

राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांना भाजप नेत्याने अडचणीत आणले आहे.
NawabMalik and Mohit Kamboj
NawabMalik and Mohit Kamboj Sarkarnama

मुंबई : क्रूझवरील पार्टीवर अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने (NCB) केलेल्या कारवाईत भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bharatiya) यांचा मेव्हणा ऋषभ सचदेव याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. मुंबईतील भाजपच्या नेत्याने फोन केल्यानंतर ऋषभ याला सोडून देण्यात आले, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दुसऱ्या खटल्याची सुनावणी आज झाली. या सुनावणीला मलिक हे न्यायालयात हजर होते.

मोहित कंबोज हे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दुसऱ्या खटल्याची सुनावणी आज शिवडी न्यायालयात झाली. या सुनावणीला कंबोज हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तर नवाब मलिक प्रत्यक्ष हजर होते. आजच्या सुनावणीला नवाब मलिक शिवडी न्यायालयात 3 तास उपस्थित होते. मलिक आज पुन्हा एकदा मोहित कंबोज यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर केलेल्या आरोपांबाबत पुरावा सादर करू शकले नाहीत.

NawabMalik and Mohit Kamboj
भाजप सोडताच बड्या नेत्याला मोठा झटका! 24 तासांतच निघालं अटक वॉरंट

न्यायालयात आज मलिक यांची कंबोज यांचे वकील फैज मर्चंट यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर मलिक यांना मर्चंट यांची माफी मागावी लागली. मलिक यांना या प्रकरणात न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना कंबोज यांच्याबद्दल मानहानीकरक वक्तव्य करण्यापासून मज्जाव केला आहे. मलिक यांनी या अटीचा भंग केल्यास त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची परवानगीही न्यायालयाने कंबोज यांना दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 29 जानेवारीला होणार आहे.

NawabMalik and Mohit Kamboj
भाजपला मोठा धक्का! आणखी एका मंत्र्याच्या राजीनाम्याने राजकीय भूकंप

मलिक यांच्या आरोपांवर बोलताना कंबोज म्हणाले होते की, मी नगरसेवक, आमदार, खासदार कोणीही नाही. मी चौकशीसाठी तयार आहे. एनसीबीच्या कारवाईत काही लोकांना वाचवण्यात माझा सहभाग आहे, असा आरोप माझ्यावर केला आहे. पण माझ्याकडे पक्षाचे कोणतेही पद नाही. मी दीड वर्षापासून राजकारणापासून अप्लित आहे. ऋषभ सचदेव हा माझा मेव्हणा आहे. त्याचा या प्रकरणाशी काय संबध आहे, याचे पुरावे नवाब मलिकांनी द्यावेत. आर्यन खानसोबत त्याची कधीही भेट झाली नाही. आम्ही एनसीबीच्या चैाकशीसाठी तयार आहोत. नवाब मलिक खुर्चीचा गैरवापर करीत आहेत. त्यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत. त्यांच्यावर मी शंभर कोटीचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com