'क्रुझवरील 'त्या' दोघांपैकी एक भाजप नेत्याचा मेव्हणा, म्हणून NCBने त्याला सोडले'

एनसीबीने पकडलेल्या १० जणांपैकी दोघांना साेडले, त्यातला एक भाजपच्या हायप्रोफाईल नेत्याचा मेव्हणा आहे, तर दुसऱ्याचेही राजकीय संबंध आहेत.
'क्रुझवरील 'त्या' दोघांपैकी एक भाजप नेत्याचा मेव्हणा, म्हणून  NCBने त्याला सोडले'
Nawab Malik Sarkarnama

अमलीपदार्थ विरोधी पथकाने (NCB) मुंबईच्या क्रुझशिपवर केलेल्या कारवाई मध्ये १० जणांना पकडले होते. त्यातल्या दोघांना सोडण्यात आले. त्या दोघांपैकी एकजण भारतीय जनता पक्षाच्या (BJP) हायप्रोफाईल नेत्यांचा मेव्हणा आहे, तर दुसऱ्याचेही राजकीय संबंध आहेत. मात्र एनसीबीने (NCB) त्याची कोणतीही चौकशी न करता त्यांना सोडले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) केला आहे.

Nawab Malik
चिपीनंतर रत्नागिरी विमानतळाचा मार्ग मोकळा

नवाब मलिक आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी या दोघांना का सोडले, कोणत्या नेत्याच्या सांगण्यारुन त्यांना सोडले, याचे उत्तर समीर वानखेडे यांनी द्यावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. एनसीबीने या १० जणांना कार्यालयात आणले आणि काही तासांनी त्यातल्या दोघांना सोडले, याबाबतचे सर्व पुरावे उदया दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदेत देणार असल्याची माहितीही नबाव मलिकांनी दिली आहे.

त्याचबरोबर केंद्रसरकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तपास यंत्रणांचा गैरवापर करुन सुडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोपही नबाव मलिकांनी केला आहे. राज्यसराकने आतापर्यंत कोणत्याही विरोधी पक्षनेत्यावर सुडबुद्धीने कारवाई केली नाही, पण केंद्रसरकार ही कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, आता राज्यसरकारही भाजपच्या नेत्यांनी केलेले भ्रष्टाचार आणि घोटाळे बाहेर काढणार असून आम्ही या लढाईला सज्ज आहोत, असे खुले आव्हान नबाव मलिक यांनी यावेळी बोलताना दिले आहे.

Related Stories

No stories found.