त्यावेळी राऊतांकडे काहीच उत्तर नव्हते...नवनीत राणांनी सांगितला लडाख दौऱ्याचा 'तो' प्रसंग

मी माझे कर्तव्य पूर्ण केलं. माझी विचारांची लढाई संपलेली नाही.
navneet rana, Sanjay Raut Latest Marathi  News
navneet rana, Sanjay Raut Latest Marathi Newssarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे लेह-लडाखमधील अभ्यास दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर याची चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान यावर राऊत आणि नवनीत राणा यांनी या दौऱ्याबाबत प्रसार माध्यामांशी संवाद साधत आपण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपल्याचं म्हटलं आहे. तर राणा यांनी दौऱ्यातील एक किस्सा सांगत राऊतांना चिमटाही काढला आहे. त्यावर राऊतांची काय प्रतिक्रिया येते हे बघाव लागणार आहे. (Navneet rana & Sanjay Raut Latest Marathi News)

navneet rana, Sanjay Raut Latest Marathi  News
'आम्हाला जेवढं दाबाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ, लावा ताकद!'

लेह-लडाख दौऱ्याबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, माझी विचारांची लढाई असून ती मी विचारांने लढणार आहे. माझी लढाई हे माझे विचार असून ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत. राऊत तिथे आले म्हणून मी गेले नसते तर मी माझ्या कामाशी अन्याय केल्यासारखे झाले असते. माझा समजुतदारपणा मोठा असून मी त्याप्रमाणेच त्यांच्याशी वागले. त्यांच्यावर काही अन्याय झाला नाही तर अन्याय हा माझ्यावर झालायं. तरीही मी माझे कर्तव्य पूर्ण केलं. माझी विचारांची लढाई संपलेली नाही. ते महाराष्ट्राच्या हिताचे काम करत नाहीत. त्याविरोधात मी लढत राहणार आहे. त्यांच्याबद्दल जे काही बोलले त्यावर आजही मी कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

नवनीत राणा म्हणाल्या, माझ्यासोबत महाराष्ट्रात जे घडलं, तो अन्याय झाला. त्याविरोधात मी 23 तारखेला संसदीय समितीसमोर जाऊन माझा हक्क बजावणार आहे. जे माझ्या विरोधात बोलले त्याच्या सर्वांबाबत मी साक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी लेह-लडाख दौऱ्यादरम्यान घडलेला एक किस्साही सांगितला.

राऊतांसमोर मला एका मुलीने विचारलं की महिलांना पुढे येऊ का दिलं जात नाही. त्यावेळी मी म्हणाले की, मी आली आहे, मी जेलमध्येही जाऊन आले, मला जेलमध्ये टाकणारे लोक इथेच बसले आहेत. त्यावर राऊतांकडे मात्र काहीच उत्तर नव्हते. ते फक्त यावर हसले, असा मजेदार किस्सा नवनीत राणांनी सांगितला आहे.

navneet rana, Sanjay Raut Latest Marathi  News
साहेबांसाठी आम्ही लाठ्याकाठ्या झेलायच्या आणि राउतांनी मात्र, राणांच्या पंगतीत बसून पेटपूजा करायची!

दरम्यान, काही दिवसांपुर्वी राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून पैसे घेतल्याचा त्यांनी आरोप केला होता. तर नवनीत राणा यांनी राऊत यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दिल्ली पोलिसांकडे केली होती. याबाबतचे पत्रही त्यांनी दिले होते. राऊतांनी आपल्याला 420 म्हणत बदनामी केली म्हणत नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. याचबरोबर राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील अनेकदा गंभीर आरोप केलेले आहेत. मात्र, पार्श्वभूमीवर राऊत आणि राणा दांपत्य एकत्र दिसल्याने चर्चेला ऊत आला तर काही शिवसौनिकांनी राऊतांवर सोशल माध्यमावर जोरदार टीकाही केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com