सोमय्या यांनी भेट घेताच राणा दांपत्याच्या डोळ्यात अश्रू.....

रवी राणा (Ravi Rana) देखील मानसिकदृष्ट्य खचले; सोमय्यांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
सोमय्या यांनी भेट घेताच राणा दांपत्याच्या डोळ्यात अश्रू.....
Ravi Rana, Navneet Rana,Kirit Somaiyasarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' निवास्थानासमोर हनुमान चालिसा म्हण्याचा इशारा देणाऱ्या राणा दांपत्यांची आज 12 दिवसांनी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना स्पॉडेलायटिसचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांच्यासह भाजप (Bjp) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रूग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली.

Ravi Rana, Navneet Rana,Kirit Somaiya
राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; मराठा मुलांच्या सवलती थांबवल्या

यावेळी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. सोमय्या म्हणाले, राणा यांचे तुरुंगातील अनुभव ऐकल्यानंतर मला इंग्रजांच्या काळातील तुरुंगाची आठवण झाली. रवी राणा यांना रूग्णालयात दाखल होण्याची गरज नसली तरी या सर्व प्रकारानंतर त्यांनादेखील खूप मोठा धक्का बसल्याचे सोमय्या म्हणाले. त्यामुळे ते देखील मानसिकदृष्ट्य खचले आहेत. राणा दांपत्यांचे जेलमधील अनुभव भयानक आहेत. राणा यांना 7 तास बसवून ठेवले, पाणीही दिले नाही.

उद्धव ठाकरे यांचे हे माफिया सरकार आहे. हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना असा अनुभव? नवनीत राणा यांच्यावर उपचार सुरू झाले आहे. नवनीत राणा यांचा स्पॉंडीलायसिस त्रास वाढला आहे. त्यांना रांगेत 7 तास उभे ठेवले, फरशीवर बसवून ठेवले म्हणून त्यांना त्रास वाढला आहे. रवी राणा पत्नीला भेटून भावुक झाल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

Ravi Rana, Navneet Rana,Kirit Somaiya
भोंग्याची धास्ती आता पोलिस अधिका-यांना; नोकरी जाण्याचीही भिती

राणा दांपत्याला जेलमध्ये झालेल्या त्रासाच्या कथा फारच वेदनादायक आहेत. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे असे हाल ठाकरे सरकार करसत आहे, असा सवालही सोमय्या यांनी केला. नवनीत राणा यांच्या संपूर्ण चाचण्या करण्यास सांगितले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरु करण्यात आले आहेत. उद्या आणखी काही चाचण्या कराव्या लागणार आहे. तुरुंगातून सुटका होताच रवी राणा यांनी लीलावतीमध्ये धाव घेत नवनीत राणा यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते हे अश्रू पत्नीच्या प्रकृतीच्या काळजीपोटी होते, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.