नवनीत राणा आक्रमक; लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित केले गंभीर आरोप

'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
navneet ravi rana
navneet ravi ranasarkarnama

मुंबई : 'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेचे आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. या संबंधी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Omprakash Birla) यांना एक पत्र लिहिले असून त्यामध्ये हा आरोप केला आहे.

नवनीत राणा या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात राणा म्हणाल्या आहेत की "आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिले नाही. तसेच माझ्या जातीवरुन माझा पोलीस ठाण्यात छळ केला गेला. खालच्या जातीची असल्याने मला बाथरुम वापरु दिले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी रविवारी शिवसेनेवर असाच एक आरोप केला होता. मागासवर्गीय महिला आहे म्हणून मला शिवसेनेकडून अपमानस्पद वागणूक दिली जात आहे. माझ्याबदल खालच्या दर्जात बोलले जात आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.

navneet ravi rana
काँग्रेस आमदाराला न्यायालयाचा दिलासा! मोदींवर ट्विट केलं म्हणून झाली होती अटक

दरम्यान, या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, नवनीत राणा यांना तुरुंगात हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणांना पिण्याचे पाणीही देण्यात आलेले नाही. एवढंच नव्हे तर त्यांना वॉशरुमलाही जाऊ दिले नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. राणांना तुरूंगात दिली जाणारी वागणूक लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.

navneet ravi rana
हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का ?

आता लोकशाहीबद्दल ओरडणारे कुठे आहेत? नवनीत राणा यांना देण्यात येत असलेल्या वागणुकीबद्दल त्यांनी वकिलांच्यामार्फत लोकसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून एका खासदाराला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह असेल तर तो आम्ही रोज करायला तयार आहोत, असेही फडणवीस म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com