शिवसैनिक आमचं काही बिघडवू शकत नाहीत; किती दम आहे बघू : राणांनी ललकारले!

Navneet Rana | Ravi Rana : उद्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठन करण्यावर राणा दाम्पत्य ठाम!
MP Navnit Rana
MP Navnit RanaSarkarnama

मुंबई : आम्हाला पोलिसांनी नोटीस दिली, घरातून बाहेर पडू नका म्हणून सांगितले, अमरावतीत थांबवण्याचा प्रयत्न केला, पण जे आम्ही बोललो आहे, त्याप्रमाणे उद्या सकाळी 'मातोश्री'बाहेर जावून 'हनुमान चालिला' पठण करणारचं आहे. आता विरोध करणाऱ्या शिवसैनिकांच्यात दम आहे की, आमच्या हनुमान चालिसा पठण आणि नामस्मरणामध्ये हे बघू, असे आव्हान देत अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेनेला ललकारले.

आज राणा दाम्पत्य मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालिसा पठण करण्यास विरोध करत आहेत, जर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हनुमान चालिसा पठणं करण्यासाठी तयार केले असते तर माझ्या महाराष्ट्राचे काही तरी भलं झाले असते. महाराष्ट्राचे नागरिक म्हणून उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंती दिवशी महाराष्ट्रातील संकट दुर करण्यासाठी कोणत्याही देवळात, मंदिरात डोकं टेकवलं नाही. वीज, बेरोजगारी, शेतकरी यांचे प्रश्न असून ते कधी या संकटांवर बोलत नाहीत. दोन वर्ष मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत त्यामुळे विचार करा महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे.

MP Navnit Rana
हनुमान चालिसाला विरोध करणारे बाळासाहेबांचे सैनिक नाहीत; उद्या मातोश्रीवर जाणारच!

राणा पुढे म्हणाल्या, जे लोक आम्हाला विरोध करत आहेत, त्यांना सांगते की, आम्ही केवळ नामस्मरण करण्यासाठी, बाळासाहेबांच्या विचाराचे स्मरण करण्यासाठी जात आहोत. आम्ही बाळासाहेबांचे विचार ऐकूणच लहानाचे मोठे झालो. त्यांनी कधीही पदासाठी आणि सत्तेसाठी विचारांशी तडजोड केली नाही. आज त्यांच्यावर बळावर त्यांची तिसरी पिढी मंत्रीपद उपभोगत आहे, राजकीय पोळ्या भाजत आहेत, अशी टीका राणा यांनी उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केली. सोबतच तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि हनुमानचे नामस्मरण माझ्यासोबत आहे, त्यामुळे शिवसैनिक काहीही बिघडवेल असं वाटत नाही, असेही राणा म्हणाल्या. तसेच सत्ताधारी शिवसेनाच आम्हाला धमकावून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

MP Navnit Rana
रवी राणा २३ एप्रिलला 'मातोश्री'बाहेर धडकणार; काँग्रेस आमदार म्हणतात, फक्त पोचून दाखवावे!

यावेळी बोलताना आमदार रवि राणा म्हणाले, हनुमान जयंतीदिवशी आम्हाला विरोध करण्यात आला. पण ज्यांनी आम्हाला विरोध केला ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्या ह्रदयात आहेत. मातोश्री हिंदुसाठी मंदिर आहे, पण आता याच ठिकाणी जर हनुमान चालिसा वाचण्यास विरोध होत असल्यास उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. हिंदुत्वाची दिशा सोडून ते दुसरीकडेच कुठेतरी जात आहेत आणि महाराष्ट्राच वाटोळे करत आहात. म्हणून हे आलेले विघ्न संपवण्यासाठीच उद्या आम्ही मातोश्रीवर जाणारच आहे असे, रवि राणा यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com