राणा दाम्पत्याची माघार! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात विघ्न नको म्हणून केली मोठी घोषणा

Navneet Rana | Ravi Rana : मोदींचा दौरा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचाही आरोप
Ravi Rana-Navneet Rana
Ravi Rana-Navneet RanaSarkarnama

मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा वाचण्यावरुन राज्यात सुरु असलेल्या शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य संघर्षाची आता अखेर होण्याची शक्यता आहे. आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी आपल्या भूमिकेवरुन माघार घेणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उद्या (रविवारी) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये त्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्या पंतप्रधान मोदी उद्या (रविवारी) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणार प्रथम स्मृती पुरस्कार पंतप्रधान मोदी जाहिर झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागू नये, ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही आमचे आंदोलन मागे घेत असल्याचे आमदार राणा म्हणाले. यावेळी त्यांनी आपण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली असून त्यांचीही हीच इच्छा आहे. त्यामुळे आम्ही केवळ दबावाने किंवा धमक्यांना घाबरुन माघार घेतलेली नाही हे देखील स्पष्ट केले.

मागील दोन दिवसांपासून मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याच्या मु्द्यावरुन शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य संघर्ष पेटला आहे. शिवसेना आणि शिवसैनिकांनी कितीही अडवले तरी आपण मातोश्रीबाहेर जाणारच असा ठाम निर्धार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी बोलून दाखवला होता. राणा यांच्या या इशाऱ्यानंतर त्यांच्या शिवसेनेने अधिक आक्रमक होत राणा यांना धडा शिकविण्याचा निर्धार शिवसैनिकांनी बोलून दाखवला होता. मात्र या सगळ्या संघर्षा दरम्यान आता राणा दाम्पत्यांनी आज या आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान शिवसैनिक आक्रमक झाल्याने पोलिसांनी आज राणा दाम्पत्याला घरातच नजरकैदेत ठेवले होते. 10 ते 12 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस असा मोठा फौजफाटा त्यांच्या घरामध्ये तैनात करण्यात आला होता. यासोबतच मोठ्या प्रमाणावरील पोलीस बंदोबस्त राणा यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आला होता. नवनीत राणा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर न पडण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही त्यांनी भूमिका न बदलल्याने पोलिसांनी राणा दाम्पत्याला नजरकैदेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com