राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; शिवसैनिकांच्या आक्रमकतेनं मातोश्रीबाहेरचं वातावरण तापलं

मातोश्रीबाहेर येवून दाखवा! शिवसैनिकांचे राणा दाम्पत्याला आव्हान
Ravi Rana-Navneet Rana
Ravi Rana-Navneet RanaSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) निवासस्थानाबाहेर २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धारने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा हे दाम्पत्य आज सकाळी मुंबईमध्ये दाखल झाले आहे. यापूर्वी ते आज (ता. २२ एप्रिल) विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होते. पण पोलिस आणि शिवसैनिकांच्या हातावर तुरी देवून दोघेही मुंबईत दाखल झाले आहेत. (Navneet Rana And Ravi Rana Reached at mumbai)

मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून पोलिसांनी राणा दाम्पत्याला अमरावतीमध्येच स्थानबद्ध करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे मागील २ दिवसांपासून अमरावती पोलिस खासदार राणा आणि आमदार राणा यांच्यावर नजर ठेवून होते. तर मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार म्हणून शिवसैनिक देखील आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी राणांना तुम्ही केवळ बडनेरा स्थानकावर पोहचून दाखवा असे आव्हान दिले होते. मात्र या सर्वांच्या हातावर तुरी देवून राणा दाम्पत्य एक दिवस आधीच मुंबईत दाखल झाले आहेत.

परिणामी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरण अधिक तणावग्रस्त बनलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी मातोश्रीकडे वाईट आणि वाकड्या नजरेने बघू नका अन्यथा परिणाम बघा असा इशारा दिला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला आहे. बॅरिकेटींग करण्यात आली आहे. तसेच मातोश्री बाहेरील एक रस्ता संपूर्णपणे बंद करत येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत सोडले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com