महिला आयोगाचे निर्देश असले तरी नाईकांना अटक नाही! पोलीस आयुक्तांनीच सांगितलं कारण

भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, ते अडचणीत आले आहेत.
Ganesh Naik
Ganesh Naiksarkarnama

मुंबई : भाजप (BJP) नेते आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यानंतर नाईकांच्या विरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. या प्रकरणी नाईकांना त्वरित अटक करा, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी नवी मुंबई पोलिसांना दिले आहेत. असे असले तरी नाईकांनी लगेच अटक होणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

महिला आयोगाने निर्देश दिले असले तरी नाईक यांना लगेच अटक होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमारसिंह यांनी गणेश नाईक यांना तातडीनं अटक होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गणेश नाईकांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या महिलेच्या जबाबांची तपासणी आम्ही करीत आहोत. त्यांची सत्यता तपासण्यात येत आहे. ही तपासणी झाल्यानंतर आम्ही कायद्यानुसार योग्य कार्यवाहीचे पाऊल उचलू.

Ganesh Naik
भाजपचा बडा नेता अडचणीत! चाकणकरांनी दिले अटकेचे पोलिसांना निर्देश

या महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही, या महिलेला व तिच्या मुलाला पोलिसांनी सुरक्षाही पुरवली नाही. त्यामुळे नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा व आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे केली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ४२०, ५०४, व ५०६ नुसार नाईकांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही तिने केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दोन दिवसात याप्रकरणी तपास करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश दिले होती. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर नाईक यांना त्वरीत अटक करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Ganesh Naik
शरण येण्याचा प्रस्ताव युक्रेननं धुडकावताच रशियाकडून विध्वंस सुरू

संबंधित महिलेने याबाबत नुकतीच महिला आयोगाकडे तक्रार केली होती. तिने पोलिसांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतल्याने या महिलेने आयोगाकडे धाव घेतली होती. नाईक यांच्यासोबत असलेल्या संबंधातून आपल्याला पंधरा वर्षाचा मुलगाही असल्याचा दावा या महिलेने केला आहे. नाईक हे 1993 पासून माझे लैंगिक शोषण करत आहेत. त्यांनी लग्नाचे आमिष देऊन तसेच ठार मारण्याची धमकी देऊन माझे शोषण केले, असे या महिलेने म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com