'पवार कुटुंबाचे विसर्जन करणारा जन्माला यायचाय!'

राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
Mahebub Shaikh
Mahebub Shaikhsarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा (ncp) बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. बारामतीत लोकसभा मतदार संघात विजय मिळवण्यासाठी भाजप कामाला लागली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या स्वत: बारामती पिंजून काढणार आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत जाऊन सभा घेऊन राष्ट्रवादीला ललकारले आहे. महेबूब शेख यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. बारामतीत काळू बाळूंनी जाऊन तमाशा घातला, असा जोरदार हल्लाहोल त्यांनी केला. तसेच पवार कुटुंबाचे विसर्जन करणारा अजून जन्माला यायचा आहे. एक तरी बारामती महाराष्ट्रात उभी केली का? याचे उत्तर महाराष्ट्राला द्या, असेही महेबूब शेख म्हणाले.

Mahebub Shaikh
AJit Pawar : सत्तासंघर्षावर अजित पवार म्हणतात; यांनी कितीही आव आणू द्या...

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नव्याचे नऊ दिवस आहे. त्यांना स्वत:ला उमेदवारी दिली नाही. पत्नीला शेवटच्या दिवशी अर्ज मागे घ्यायला सांगितले. ही यांची पक्षातली विश्वासार्हता. यांनी काय गप्पा माराव्यात, असे पवार म्हणाले. मी आहे खंबीर, असा निशाणा अजित पवार यांनी बावनकुळे यांच्यावर साधला.

Mahebub Shaikh
गारटकरांचा गणपती कुणाला पावणार ? ; हर्षवर्धन पाटील, भरणे की धनंजय मुंडेंना..

बारामतीला धडका मारायला गेले, धडका मारून काय होणार आहे? गेल्यावेळेस माझ्या विरोधात निवडणूक लढवली. त्यांच्या सहीत सगळ्यांचे डिपॉजित जप्त झाले. हे येणार, ते येणार, आम्ही त्यांच स्वागत करु, असेही अजित पवार म्हणाले. आम्हाला राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसा त्यांना भाजप वाढवण्याचा अधिकार आहे. संपर्क वाढवा, बुथ कमिट्या केल्या पाहिजे, असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com