Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंच्या अडचणी वाढल्या ;..सेनेचा विरोध

Satyajit Tambe News : नाशिक पदवीधर निवडणुक बिनविरोध होऊ देणार नाही,अशा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
Satyajit Tambe
Satyajit Tambe Sarkarnama

Satyajit Tambe News : नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency Election ) डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

'सर्व पक्षाचा पाठिंबा मिळेल,' असे सत्यजीत तांबे यांनी म्हटलं होते. पण त्यांच्या आशेवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे. नाशिक पदवीधर निवडणुक बिनविरोध होऊ देणार नाही,अशा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. (Nashik Graduate Constituency Election news update)

Satyajit Tambe
Satyajit Tambe News : तांबेंचं 'पितळ' उघड ; अजितदादांनी केला थोरातांबाबत मोठा गौप्यस्फोट

तांबेच्या उमेदवारीला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने विरोध केला आहे. सत्यजीत तांबे हे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा होती, पण त्यांनी ऐनवेळी

अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे, ते भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे उमेदवार म्हणून आमचा त्यांना पाठिंबा होता, पण तांबेंनी खेळी केल्यानं आमचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे, असे शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे.

Satyajit Tambe
Urfi Javed-Chitra Wagh Controversy : उर्फी जावेद-चित्रा वाघ वादाबाबत मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

सत्यजीत तांबेंनी बंडखोरी केल्याने त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि आघाडीतील घटक अन्य दोन पक्षही नाराज आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिक पदवीधरसाठी धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर आज पाटील यांनी थेट मातोश्रीवर धाव घेत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

संजय चव्हाण म्हणाले, "टीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ याबाबत सोमवारी (ता.16) भूमिका स्पष्ट करणार आहे. तांबे हे भाजपचे उमेदवार आहे हे ओपन सिक्रेट असून तांबे बंडखोर उमेदवार असल्याचा आरोप महाराष्ट्र शिक्षक सेनेने केला आहे. पदवीधर मतदार संघ हा कुणाचा सातबारा नाही, की बापानंतर मुलाने निवडणुकीला उभे राहावे,"

Satyajit Tambe
RSS ने जागवल्या चाळीस वर्षांपूर्वींच्या त्या आठवणी...

सत्यजित तांबे हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. इतर पक्षांतून आलेल्यांना रिझर्व्हेशन मिळत असेल तर पक्षातील निष्ठावंतांची घुसमट भयंकर वाढली असणार हे नक्की, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

'सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला बाळासाहेब थोरात यांचे समर्थन आहे का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले,"सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबाबत नाशिकमध्ये काहीतरी गुपित शिजतयं याची माहिती मिळाली होती, याबाबत मी बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली होती पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in