नरेंद्र मोदींचा 10 लाखाचा सूट चालतो, पण राहुल गांधीचा टी शर्ट डोळ्यात खुपतो का ?

Congress-BJP | केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या शर्टवरुन त्यांच्यावर टीका केली.
Rahul Gandhi| Narendra Modi|
Rahul Gandhi| Narendra Modi|

डोंबिवली : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. कन्याकुमारीपासून सुरू झालेला हा प्रवास सध्या केरळपर्यंत पोहचला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत असून लोकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी घातलेल्या शर्टवरुन भाजप-कॉंग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या शर्टवरुन त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधींच्या टी-शर्टची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचा दावा करत भाजपने त्यासंबंधी एक ट्विट ही केले. राहुलच्या फोटोसोबत आणखी एक टी-शर्ट आणि किंमतीचा टॅग दिसत आहे.

Rahul Gandhi| Narendra Modi|
आधी जनतेतून निवडून येऊन दाखवा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन दानवे-भुमरेंमध्ये जुंपली

त्यावर पण कॉंग्रेसने भाजपला जशात तसे उत्तर दिले आहे. अरे... घाबरलास का? भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून. पण बोलायचंच असेल तर बेरोजगारी आणि महागाई या विषयावर बोला. बाकी कपड्यांबद्दल चर्चा करायची झाली तर मोदीजींचा १० लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा यावर चर्चा होईल. मग सांगा करायची का चर्चा,'' असे ट्विट करत कॉंग्रेसने भाजपवर पलटवार केला आहे.

तर मुंबईमध्येही, बॅनरबाजीतून भाजपवर पलटवार केला आहे. मोदींचा 10 लाखाचा सूट चालतो, अनुराग ठाकुरच्या मुलाचा टी शर्ट चालतो, मात्र राहुल गांधीचा टी शर्ट डोळ्यात खुपतो ? स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून, अशा शब्दांत भाजपवर टीका करण्यात आली आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधीही भाजपवर आक्रमक दिसत आहेत. सीबीआय, ईडी आणि आयटीचा वापर करून भाजप विरोधकांना घाबरवू शकते असे भाजपला वाटत आहे. भारताय जनता त्यांनी घाबरत नाही हे त्यांना लोकांना समजत नाहीत. भारतीय एकाही विरोधी पक्ष नेत्याला भाजपची भीती वाटत नाही, असे राहुल गांधींना ठणकावून सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com