Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Narendra Modi: मोठी बातमी! पंतप्रधान मोदी येत्या १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर; काय आहे कारण?

Narendra Modi Mumbai Visit : ...म्हणून पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्व

Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. या दौऱ्यावेळी मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचं उद्घाटन केले जाणार आहे. आगामी काळात होणार्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या ( Narendra Modi) मुंबई दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या दौर्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांची सह्यादी अतिथी गृहावर मंगळवारी रात्री 8:30 वाजता विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत मोदींच्या मुंबई दौऱ्यातील तयारीवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

Narendra Modi
Patan : मंत्री शंभूराज देसाईंची तत्परता; ५५ प्रवाशी सुखरूप घरी परतले....

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. या दौऱ्यावेळी मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचं उद्घाटन केले जाणार आहे.

मात्र, या सत्तांतरानंतर राज्यात उमटलेले राजकीय पडसाद, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, महाराष्ट्रातील मोठे उद्योग प्रकल्प गुजरातला पळविल्याचा ठपका, राज्याबाहेर राज्यपालांचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं अवमानकारक वक्तव्य, भाजप शिंदे गटातील मंत्र्यांची महापुरुषांविषयींचं वादग्रस्त विधानं, शिंदे फडणवीस सरकारवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालेलं असतानाच दुसरीकडे मोदींचा मुंबई दौरा होणार आहे.

यामुळे भाजपकडून जोरदार मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरु असतानाच दुसरीकडे विरोधकांकडून या मोदीवर काय प्रतिक्रिया दिल्या जातात हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Narendra Modi
Pankja Munde; पंकजा मुंडे खरच राजकारण सोडतील का?

मुंबई महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट, शिंदे गट, मनसे, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे भाजप मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन करत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यांचा प्रयत्न असणार आहे. याच धर्तीवर मोदींचा मुंबई दौरा हा भाजपच्या निवडणूक प्रचाराच्या रणनीतीचा भाग असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in