मेहतांच्या पक्षात परतण्यावर प्रश्नचिन्ह, स्वागताला ना जिल्हाध्यक्ष, ना प्रदेशचे नेते

दोन वर्षांपुर्वी त्यांनी काही कारणास्तव पक्षाचा राजीनामा दिला होता.
मेहतांच्या पक्षात परतण्यावर प्रश्नचिन्ह, स्वागताला ना जिल्हाध्यक्ष, ना प्रदेशचे नेते
Narendra Mehta Sarkarnama

संदीप पंडित

विरार : मीरा भाईंदरचे (Meera- Bhaindar) भाजप'चे (BJP) माजी आमदार आणि वर्षभरापुर्वी राजीनामा दिलेले नरेंद्र मेहता (Narendra Mehta) पुन्हा पक्षात सक्रिय झाले आहेत. २०१९ च्या पराभव आणि भाजपच्याच एका नगरसेविकेने त्यांच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र रविवारी (२५ सप्टेंबर) त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या मुहुर्त साधून पुन्हा पक्षात प्रवेश केला, पण पक्षात त्यांच्या स्वागताला त्यांच्या समर्थकांशिवाय ना जिल्हाध्यक्ष आले ना प्रदेशाचे कोणी नेते आले.

Narendra Mehta
'दादापेक्षा नाना मोठा' पटोलेंची जोरदार टोलेबाजी

तर दूसरीकडे मेहता यांच्या समर्थकांनी गर्दी जमवून त्यांचा वाढदिवस साजरा केल्याने त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचेच डॉ. सुरेश येवले आणि शिवसेनेने केली आहे. मोठा गाजावाजा करत पक्षात परत येत असल्याचे मोठं मोठे बॅनर लावून परतणाऱ्या नरेंद मेहता यांचे पक्षात मोठे स्वागत होईल असे वाटले होते. परंतु या इव्हेंटकडे पक्षाच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष केले तर जिल्हाध्यक्षांनी आपल्याला या बाबत माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. त्यामुळे आता पक्षात त्यांना कोणते पद देऊन पुनर्वसन केले जाते. याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.

नरेंद्र मेहता यांच्या पक्षात येण्याने जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांचे जिल्हाध्यक्षपद जाणार का? की नरेंद्र मेहता यांच्याकडे दुर्लक्ष करून पार्टी विथ डिफ्रण्ट ही बिरुदावली पक्ष कायम ठेवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एका बाजूला पक्षाने पूर्णपणे पक्षात येणाऱ्या मेहता यांच्याकडे दुर्लक्ष केले असताना दुसऱ्या बाजूला त्यांचा वाढदिवस ही वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

पंडित दीनदयाळ यांच्या जयंती कार्यक्रमाला परवानगी घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहता यांचा वाढदिवस साजरा केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याला साथ दिली आहे ती भाजप आणि संघाचे कार्यकर्ते असलेल्या डॉ. सुरेश येवले यांनी. डॉ. येवले यांनी पोलिसांकडे कोरोना कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नरेंद्र मेहतावर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या कार्यक्रमात कोणीही मास्क घातला नसल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in