BJP-MNS Politics : नारायण राणेंनी पुन्हा घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

राज्यातील सत्तांतरानंतर भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.
BJP-MNS Politics :
BJP-MNS Politics :

Narayan Rane- Raj Thackeray Visit : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. राणे यांनी काही वेळापुर्वीच राज ठाकरे यांच्या शीवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे. सत्तांतरानंतर भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या सातत्याने भेटीगाठी होत आहेत. त्यातच आज पुन्हा राणे यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुक तोंडावर आली असल्याने या भेटीला विशेष म्हत्तव असल्याचंही बोललं जात आहे. निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी तेवढीच ताकद लावावी लागणार असल्याने युतीत विविध पक्षांचा समावेश करण्यासाठी भाजप नेत्यांच्या हालचाली वाढल्या असल्याचं बोललं जात आहे.

BJP-MNS Politics :
Farmers : धान उत्पादकांना मिळणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जाणार...

पण दुसरीकडे नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट वैयक्तिक असल्याचंही बोललं जात आहे.पण असं असलं तरी दोन राजकीय नेत्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यात राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणं सहाजिक आहे. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in