Narayan Rane : 'संजय राऊत खूश! कारण सेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल'

Narayan Rane|Sanjay Raut : नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
Sanjay Raut Latest News, Narayan Rane News in Marathi
Sanjay Raut Latest News, Narayan Rane News in Marathisarkarnama

Narayan Rane: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत (Shivsena) खळबळ उडाली असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि भाजप (BJP) नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. (Narayan Rane News in Marathi)

बंड करून शिंदे यांनी आपल्यासोबत सुमारे 30 हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना शिवसेनेत झालेल्या बंडाला कारणीभूत ठरवत शिवसेना संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल, असा खोचक टोला राणे यांनी लगावला आहे.

Sanjay Raut Latest News, Narayan Rane News in Marathi
लोकांचा लोकनाथ एकनाथ... डोंबिवलीत शिंदेना पाठिंबा दर्शविणारे बॅनर

राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “संजय राऊत खूश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने,”अशा शब्दात पाटलांनी राऊतांवर निशाणा साधला.

मंगळवारी (ता.21 जून) शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून संवाद झाला होता. यावेळी शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि संजय राऊत हे प्रत्यक्षात एक आणि माध्यमांसमोर दुसरं बोलत असल्याचा आरोप केला होता. याच मुद्द्यावरून आज राणेंनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

दुसरीकडे, भाजपच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेच्या आमदारांचे अपहरण होणं शक्य नाही, असा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे. या सर्व प्रसंगातून शिवसेना तावून सुलाखून निघेल. सीतेला एकदाच अग्रिपरीक्षा द्यावी लागली होती. शिवसेना अशा अग्निपरीक्षांना वारंवार सामोरं गेली आहे. स्वत: ला शिवसैनिक म्हणवून घेणारे कितीजण निष्ठेच्या अग्निपरीक्षेत पास होतात, हे भविष्यात दिसेल,” असे भावनिक आवाहन राऊत यांनी केले होते. मात्र, या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याचे सध्यातरी दिसत आहे.

Sanjay Raut Latest News, Narayan Rane News in Marathi
गुलाबराव 'सरकारनामा'शी बोलले : मी गुवाहटीला चाललो... हितं काय करू?

दरम्यान, थोड्यावेळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद सांणार,असे सांगण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात आणि काय निर्णय घेतात याकडे राज्याच लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com