मुख्यमंत्र्यांची सभा ऐकताना राणे घड्याळ लावून बसले होते! त्यांनीच सांगितलं कारण

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका
Narayan Rane
Narayan Ranesarkarnama

मुंबई : गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी किती जणांच्या चुली पेटवल्या हे सांगावे, तुम्ही चुली पेटवणारे नाही तर चुली उद्धस्त करण्याचे काम केले. मराठी तरुणाच्या हातात दगड दिले, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सभा घेत, भाजपवर चौफेर टीका केली होती. त्यावरुन राणे यांनी ठाकरे यांना प्रत्यूत्तर दिले.

नारायण राणे यांनी मुंबईमध्ये भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. राणे म्हणाले, यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते, अशी टीका त्यांनी केली. दिशा सॅलियन, सुशांत सिंह यांना ठार मारले, यांनी जया जाधव आणि रमेश मोरे यांना का मारले याची उत्तरे द्यावीत. घरा भेदी कोण आहे, असा सवाल राणे यांनी केला.

Narayan Rane
भोंग्या पेक्षा कांदें-बटाट्याचे भाव महत्वाचे; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितले...

मी जवळपास 39 वर्ष शिवसेनेत होतो. पदाची अपेक्षा न ठेवणारे एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आता राज्याचे मुख्यमंत्री काय आणि कुठल्या भाषेत बोलू शकतात याचा अंदाज जनतेला आला आहे. कोण चूल पेटवत? तुम्ही अडीच वर्षात किती लोकांच्या चुली पेटवल्या? किती लोकांना नोकऱ्या दिल्या, असा सवाल राणे यांनी केला.

14 तारखेला फार मोठा गवगवा करून मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सभा घेतली. शिवसैनिकांना अडित वर्षात काय दिले. जमून-जमून ३०-३५ हजार लोक होते सभेला. त्यात अर्धे फेरीवाले होते. ३०० रुपये देऊन सभेला लोक आणलो होते, असा आरोपही राणे यांनी केला. पेपरमध्ये छापता मोठी सभा, विरोधकांना धुतले, १ तासाचे खणखणीत भाषण, असेही काही नाही. मी सभा बघताना घड्याळ लावून बसलो होतो. सभा फक्त ५० मिनिटेच चाली, असा दावा राणे यांनी केला.

हेरा फेरी करुन लोकांचा विश्वास संपादन करता येत नाही. आम्ही मर्द आहेत हे सांगावे लागत नाही. मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली. आतापर्यंत असंख्य मुख्यमंत्री झाले. त्यांनी राज्याची प्रतिमा उंचावण्याचे काम केले. हा इतिहास असताना परवाचे भाषण ऐकून वाईट वाटले, असेही राणे म्हणाले.

मुलगा म्हणून साहेबाना यांनी विश्वासदेखील दिला नाही. हिंदुत्व टोपीत नाही डोक्यात असावे लागते. 2019 का गेले तुमच्या डोक्यात. यांच्या हृदयात राम आहे की रावण? हे रामही नाही रावणही नाही. यांच्याकडे विकृत बुद्धीची लोक आहेत, असा आरोप राणे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबद्दल बोलता, पण तुमचा चेहरा आरशात बघा, आम्ही तुम्हाला काय म्हणायचे, असा सवाल राणे यांनी केला.

Narayan Rane
"नाक घासून मिळवलेल्या सत्तेचा माज दाखवायचा नसतो" : भाजपने राऊतांना एकाच वाक्यात ठणकावले

हे म्हणतात शिवसैनिकानो तयार रहा. कशासाठी तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी. तुम्ही काय दिले अडीच वर्षात शिवसैनिकांना? लाखाची सभा तुमच्या नशिबी नाही. मी साहेबांच्या दोन लाखाच्या, पाच लाखाच्या सभा बघितल्या आहेत. शिवसेनेवर बोलणाऱ्यांना आम्ही अंगावर घेतले. त्यामुळेच तुम्ही आज मुख्यमंत्री झालात. आता भाजपच्या अंगावर येऊ नका, असा इशाराही राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in