Eknath Shinde : मी सर्वांना कामाला लावलं ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्राला टोला

Eknath Shinde : अडीच वर्षांमध्ये राज्यातील विकासकामे मंदावली होती, त्याला गती देण्याचे काम युतीचे सरकार करत आहे
Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Uddhav Thackeray| Eknath Shinde|sarkarnama

Eknath Shinde : परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी काही दिवसापूर्वी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ठाकरे पिता-पुत्राच्या या दौऱ्यांवर शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी नुकतीच टीका केली होती. 'ज्यांच्याहातून बाण गेला ते आता बांधावर जात आहे,' असा टोला सत्तार यांनी लगावला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावरुन ठाकरेंना डिवचलं आहे. ते नंदुरबार येथे बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले,"शेतकरी संकटात होते त्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. आतापर्यंत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत दिली जात होती. मात्र, आपल्या सरकारने एनडीआरएफच्या दुप्पटीने मदत करण्याचा निर्णय घेतला. दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरचा निर्णय घेण्यात आला,"

Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Ashish Shelar : काँग्रेस-राष्ट्रवादी-समाजवादी यांच्याशी युती केल्यानं ठाकरेंचा वैचारिक लोचा !

"शेतकऱ्यांच्या नियमाने मदत जर केली असती तर 1500 कोटी रुपये लागले असते मात्र, आम्ही 6000 कोटी रुपये वाटलेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला.आता काही जण बांधावर जातायेत त्या सर्वांना मी कामाला लावले," अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे पिता-पुत्रांना टोला लगावला आहे.

शिंदे म्हणाले, "2019 लाच हे सरकार यायला हवे होते. गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यातील विकासकामे मंदावली होती, त्याला गती देण्याचे काम युतीचे सरकार करत आहे, हे सर्वसामान्याचे सरकार असून, लोकांच्या भावना पूर्ण करण्याचे काम आम्ही करत आहोत, आम्ही शेतकरी हाच केंद्रबींदू माणून काम करत आहोत. आतापर्यंत आम्ही नुकसानग्रस्तांना 6 हजार कोटींची मदत दिली."

"केंद्राने ज्या प्रकारे पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या होत्या त्याच प्रकारे राज्य सरकारनेही कमी केल्या. मात्र, गेल्या अडीच वर्षांमध्ये ते निर्णय घेण्यात आले नाहीत. परंतु आमचे सरकार आल्या-आल्या पेट्रोलमध्ये 5 आणि डिझेलमध्ये 3 रुपयांची कपात केली.गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये आपण अनेक मोठे निर्णय घेतलेत. त्यात शेतकऱ्याचे हिताचे निर्णय घेण्यात आले," असे शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com