सत्ताबदल होताच नाना पटोलेंची शेतकऱ्यांसाठी रोख मदतीची मागणी

या संदर्भात पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आज पत्र दिले आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई : जून महिना संपून जुलै महिना सुरु झाला तरी राज्यातील मराठवाड्यासह काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्याने अनेक भागात खरिपाच्या पेरण्या अजूनही झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बि-बियाणे व रोख स्वरूपात मदत करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

Nana Patole
शिवसेनेचे आमदार परत आणण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन नेते घुसले... पण बेड्यांत अडकले

या संदर्भात पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज पत्र दिले आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाअभावी पेरा खूपच कमी झाला आहे. पेरणीची ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे व शेतातील इतर कामांसाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पटोले यांनी पत्रात केली आहे.

Nana Patole
सुधीर मुनगंटीवारांची अजितदादांना पुन्हा ऑफर; ‘ते माझ्या कानात येऊन सांगा...’

प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘‘ शेतकरी नेहमीच सुलतानी किंवा आस्मानी संकटाचा सामना करत असतो. शेतकऱ्याला आधार देऊन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे सरकार म्हणून आपले कर्तव्य आहे. पावसाअभावी ज्वारी, उडीद, सोयाबिन, तूर, भुईमूग, बाजरी, नाचणी पिकांचा पेरा अत्यंत कमी झाल्याचे दिसत आहे.

खरिपाचा पेरा वेगाने व वेळेत व्हावा हे लक्षात घेता पेरणीसाठी मोफत बि-बियाण्यांसाठी तसेच रोख मदतीसाठी संबंधित विभागातील आधिकाऱ्यांना तातडीने आदेश देण्यात यावेत, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com