विधान परिषदेची रणधुमाळी : नाना पटोलेंनी तातडीने गाठले नागपूर

Nana Patole | Nagpur | Congress : काँग्रेसचा उमेदवार डेंजर झोनमध्ये
विधान परिषदेची रणधुमाळी : नाना पटोलेंनी तातडीने गाठले नागपूर
Nana PatoleSarkarnama

नागपूर : विधान परिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीच्या निकालाची बातमी ऐकण्यापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर गाठले आहे. विधानभवनात अद्याप मतमोजणी सुरु आहे, त्यातही काँग्रेसचेच उमेदवार भाई जगताप हे डेंजर झोनमध्ये आहेत. त्यांना विजयासाठी किमान ८ मतांची गरज आहे. मात्र त्यानंतरही पटोले यांनी नागपूर गाठल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आपल्याला कौटूंबिक कार्यक्रम असल्याने आपण तातडीने नागपूरला आलो असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council election) महाविकास आघाडीने ६ उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) २ आणि काँग्रेसचे २ शिवसेनेचे (Shivsena) २ उमेदवार आहेत. भाजपने पाच उमेदवार या निवडणुकीत उतरवले आहेत. या निवडणुकीत उमेदवारांना विजयी होण्यासाठी २६ मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे.

भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस कडून रामराजे रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यामध्ये थेट लढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in