नाना पटोलेंनी मानले भाजपचे आभार

काँग्रेसचे ( Congress ) राज्यसभेचे खासदार राजीव सातव ( Rajeev Satav ) यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लागली.
नाना पटोलेंनी मानले भाजपचे आभार
प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना नाना पटोले व बाळासाहेब थोरातसरकारनामा

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लागली. या निवडणुकीत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याचे काँग्रेसने निश्चित केले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेतील निरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. Nana Patole thanked BJP

काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजप उमेदवारांने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपाचे आभार मानले.

प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना नाना पटोले व बाळासाहेब थोरात
राजीव सातव यांची पत्नी प्रदेश उपाध्यक्ष : काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र देताना विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. या मान्यवरांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

या निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसची राज्यसभेची जागा त्यांच्याच जवळ अबाधित राहिली आहे. नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in