नाना पटोलेंचा शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा

देशाला भाजपविरोधात (BJP) मजबूत पर्याय द्यायचा असेल तर तो कॉंग्रेसला (Congress) वगळून चालणार नाही
Nana Patole- Sanjay Raut
Nana Patole- Sanjay Raut Sarkarnama

मुंबई : देशाला भाजपविरोधात (BJP) मजबूत पर्याय द्यायचा असेल तर तो कॉंग्रेसला (Congress) वगळून चालणार नाही. देश विकणाऱ्यांसोबत आज कोणीही उभे राहणार नाही, देशाला फक्त कॉंग्रेसशिवाय (Congress) वाचवू शकते, म्हणून शिवसेनेची (Shivsena) भूमिका योग्य असल्याचे म्हणत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेनेच्या भूमिकेला दूजोरा दिला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी आघाडी उभारण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही त्याला दुजोरा दिल्यामुळे या घडामोडींना वेग आला आहे. मात्र, विरोधकांच्या आघाडीच्या नेतृत्वावरुन सुरू असलेल्या वादावर शिवसेनेने (Shivsena) तोंडसुख घेतलं आहे.

Nana Patole- Sanjay Raut
तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत...

नाना पटोले यांनीदेखील शिवसेनेने अग्रलेखातून घेतलेल्या भूमिकेवर आपले मत स्पष्ट केले आहे. शिवसेनेने सामनातून केलेली टीका योग्यच आहे. ती देशहितासाठी घेतली असून पक्ष किंवा सरकार वाचवण्यासाठी घेतली नसल्याचे नाना पटोलेंनी म्हंटले आहे. कॉंग्रेसच देश वाचवू शकतो. आता देशानेच ठरवायचे आहे त्यांना देश विकणाऱ्यांसोबत जायचे की वाचवणाऱ्यांसोबत, असे म्हणत नाना पटोले यांनी शिवसेनेच्या भूमिकेला दूजोरा दिला आहे.

त्यासोबतच, केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी देशाची तबाही सुरु केली आहे. देशात अरुणाचल प्रदेशात चीनने अतिक्रमण केले आहे. देशात सरकारी संपत्त्या, मालमत्ता खासगी कंपन्याना विकल्या जात आहेत. त्यावर कोणी बोलत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, ममता बॅनर्जी यांनी अशी वक्तवे करुन एकप्रकारे देश विकणाऱ्यांची साथ देण्याचा संकल्प त्याठिकाणी मांडलेला होता. म्हणून शिवसेनेने सामनातून मांडलेली भूमिकाही देशाला वाचवण्यासाठी, मांडली असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com