नारायण राणेंच्या भविष्यवाणीची नाना पटोलेंनी उडवली खिल्ली

नारायण राणे यांनी मार्चमध्ये महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी केली आहे
Nana Patole
Nana Patole

मुंबई : भारतीय जनता पक्षांतील (BJP) नेत्यांच्या भविष्यवाण्यांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी खिल्ली उडवली आहे. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मार्चमध्ये महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी केली. या भविष्यवाणीला नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे.

''भाजपचे नेते दररोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही,'' अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजप नेत्यांच्या भविष्यवाण्यांची खिल्ली उडवली आहे.

Nana Patole
अमरावती हिंसाचार: संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणार

भाजपाच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, भाजपाचे नेते मागील दोन वर्षांपासून मविआ सरकार पडणार असल्याच्या भविष्यवाण्या नेहमीच करत आहेत. पण त्यांचे भविष्य काही खरे ठरत नाही. महाविकास आघाडीला दोन वर्ष झाली तरी त्यांना अजूनही दररोज सरकार पडण्याचीच स्वप्ने पडत आहेत. मात्र त्यांची भविष्यवाणी काही खरी ठरणार नाही, असा विश्वास नाना पटोले यांनी केला आहे.

त्याच वेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येणार, या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. मी पुन्हा येणार..मी पुन्हा येणार, असे म्हणणारे आता थकून गेले आहेत. आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये नवीन कुडमुडे ज्योतीषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागलेत. पण त्याची ही भविष्यवाणीही खोटी ठरणार असून महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आणि महाराष्ट्राचा विकास करणार, असा विश्वासही यावेळी नाना पटोलेंनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com