नाना पटोले म्हणाले, महाशक्ती कुणाची हे आम्हाला कळाले

भाजप व शिंदे गटाच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी उत्तर दिले.
Nana Patole
Nana Patole Sarkarnama

मुंबई - राज्यातील विधानसभेचे सभापती निवडीसाठी आज राज्यातील सर्व आमदार विधासभेत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष निवड होणार आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदार गोव्यावरून विधानसभा प्रांगणात दाखल झाले. यावेळी भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी उत्तर दिले. Mahavikas Aghadi News Update

नाना पटोले म्हणाले, "महाराष्ट्रातील घडामोडींमुळे देशातील लोकांना भाजप काय करते हे कळाले आहे. लोकशाहीत जनतेची महाशक्ती असते. मात्र त्यांची महाशक्ती वेगळी असेल. त्यांची महाशक्ती कोणती आहे हे जनतेला कळाले आहे," असा आरोप त्यांनी केला.

Nana Patole
नाना पटोले यांनी ती `चूक` केली नसती तर आज शिंदे-फडणवीस यांचे धाडस झाले नसते...

ते पुढे म्हणाले की, "राज्यपालांची भूमिका पाहता. महाशक्ती कुणाची हे आम्हाला कळाले आहे. हुकुमशाही, दडपशाहीचा वापर देशात सुरू आहे. त्याचा वापर विधानसभेत होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात राजकीय परंपरा आहे. महाराष्ट्रातील या राजकीय प्रतिमेला काळिमा लागू शकतो," असे त्यांनी सांगितले.

भाजपच्या टीकेवर त्यांनी सांगितले की, भाजप काहीही बोलू शकतात. संविधानिक व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. संविधानिक व्यवस्था कायम रहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com