'मविआचे सर्व उमेदवार विजयी होणार; मतांची जुळवा-जुळव पूर्ण!'

विधान परिषद निवडणुकीसाठी (Legislative Council election) सध्या मुंबईमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे.
Nana Patole
Nana Patolesarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी (Legislative Council election) सध्या मुंबईमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यातच महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बैठक आज रात्री होणार आहे. आघाडीचे सहाही उमेदवार बहुमताने विजयी होतील. आघाडीने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवा-जुळव पूर्ण केली आहे. विरोधकांकडे बहुमत नसल्याने त्यांची धावपळ होत आहे, असे काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

भाजपमध्ये (BJP) अंतर्गत कलह आहे. हे ते बाहेर सांगत नाहीत. आघाडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात समन्वयाने सरकारचे काम सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये छोटी चुक झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले, असेही पटोले म्हणाले. भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. आघाडीच्या घटक पक्षांची मते एकमेकांना जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Nana Patole
एमआयएमचे एक मत राष्ट्रवादीने वळवले : खडसे, निंबाळकरांचे टेन्शन गेले

लहान पक्षांची जुळवा-जुळव पूर्ण झालेली आहे. आमच्याकडे पूर्ण संख्याबळ आहे, असा दावा पटोले यांनी केला. विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील सगळी समिकरणे जुळवली आहेत. बहूमताने आमचे उमेदवार विजयी होईल, असेही पटोले यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय होईल. राज्यसभेच्या निवडणुकीत राहिलेले दोष दुरूस्त झालेले या निवडणुकीत दिसतील. आमचे सर्व उमेदवार विजयी होतील. आम्हाला आठ मतांची गरज आहे, हे खरे असले तरी भाजपला वीस मतांची गरज आहे.

Nana Patole
राज्यसभेतील दगाफटका शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी; ठाकूरांकडे केले सपशेल दुर्लक्ष

आमच्यासाठी अवघड नाही. सर्व एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत. आम्ही प्रमुख नेते एकत्र बसून स्टॅटेजी ठरवत आहोत. त्यानंतर त्या-त्या पक्षाने काम करायचे आहे. इतके साधे सुत्र यामध्ये आहे. एक बैठक मुख्यमंत्री व उपमुख्यमत्र्यांसोबत होईल. त्यामध्ये आणखी बारकाईने नियोजन करू, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com