नाना पटोले म्हणाले, भाजपने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही...
टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या नवनिवयुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना नाना पटोलेसरकारनामा

नाना पटोले म्हणाले, भाजपने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही...

काँग्रेसचे ( Congress ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी ओबीसी समाजाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग ( ओबीसी ) राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावरून नाराज आहे. याच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. Nana Patole said, BJP has not done anything for the welfare of OBC community ...

टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या नवनिवयुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, सरचिटणीस देवानंद पवार, सरचिटणीस प्रमोद मोरे, दिप्ती चवधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या नवनिवयुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना नाना पटोले
नाना पटोले भाजपच्या धमक्यांनी चिडले! म्हणाले हिम्मत असेल तर..

नाना पटोले म्हणाले, इतर मागास वर्ग (ओबीसी) लोकसंख्येने मोठा आहे परंतु या समाज घटकाला योग्य न्याय मिळत नाही. संविधानाने जे हक्क दिलेले आहेत ते समाजाला मिळाले पाहिजेत. त्यासाठी संघर्ष करू. आपल्या न्याय हक्क व मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष सदैव आपल्याबरोबर राहिल, आता ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही.

नाना पटोले पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाने 2014 व 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करुन केंद्रात सत्ता दिली पण भाजपने ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही. भाजपाने ओबीसी समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. ओबीसी समाज मागणारा नाही परंतु संविधानाने दिलेले हक्क समाजाला मिळाले पाहिजेत आणि हे अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत संघर्ष करत राहू. ही लढाई मोठ्या शिताफिने लढावी लागणार आहे. ओबीसींच्या शिष्यवृत्तीसाठी 1999 साली आपण आमदार असताना आग्रही मागणी करून त्याचा पाठपुरावा केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ओबीसी समाजातील मुलांना दहावीपर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला असे पटोले यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in