केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात नाना पटोले मैदानात

Modi Government| Nana Patole| Fuel price hike| केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी
Fuel price hike
Fuel price hike

मुंबई : देशभरात घरगुती गॅससह इंधनांच्या दराचा (fuel price hike) भडका उडाला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर दरवाढ होईल, महागाई (Inflation) होईल, अशा अंदाज वर्तवण्यात येत होता. ते आता खरे होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज ८० पैशांनी वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ३१ मार्च पासून देशभरात महागाई मुक्त सप्ताहाची घोषणा केली आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली आहे.

केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. सर्वसामान्यांना त्रस्त करणा-या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपलेल्या केंद्रसरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

Fuel price hike
Krishna Prakash यांनी वेषांतर करून गुन्हेगाराला दाखवला हिसका...

ऐन निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको म्हणून केंद्र सरकारने इंधन दरवाढ रोखून धरली. निवडणुकांमध्ये जनतेची मते घेऊन निवडणून आले आणि आता जनतेवर महागाईचा भार टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच दिवसात देशभरात पेट्रोल, डिझेल ३.२० रुपये प्रति लिटरने महागले आहे.घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे. काही ठिकाणी एलपीजी सिलिंडरसाठी एक हजार ते अकराशे रुपये मोजावे लागत आहेत. सीएनजी, पीएनजी गॅस तसेच खाद्यतेलाचे दरही वाढले असून आता १ एप्रिलपासून औषधांच्या दरातही वाढ केली जाणा आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जनतेला महागाईच्या विहीरीत लोटत असून त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही.

मोदी सरकारच्या या निर्णयाचे चटके देशातील जनता भोगत असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. तर २ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तर ७ एप्रिल रोजी राज्य मुख्यालयी मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन केले आहे. ह्या आंदोलनात काँग्रसेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील सर्वसामान्य जनतेने, स्वयंसेवी संघटनानी रिक्षा टॅक्सी असोसिएशन यांनीही या आंदोलन सहभागी होऊन केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या दरोडेखोरीविरूद्ध आवाज उठवावा.

डाव्या पक्षांच्या कामगार संघटनांनी संघटीत व असंघटीत कामगारांच्या समस्या व मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात सोमवारी (२८ मार्च) व मंगळवारी (२९ मार्च) देशव्यापी संप पुरकारला आहे, या संपालाही काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.

तर, उठसूट भ्रष्टाचाराचे आरोप करुन राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. दररोजच्या या नौटंकीला जनता कंटाळली आहे. कोण भ्रष्टाचारी आहे? हे जनतेलाही माहित आहे. याच किरीट सोमय्या यांनी नारायण राणे, कृपाशंकरसिंह यांच्यावरही याच पद्धतीचे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ह्या दोघांनी भाजपात प्रवेश केल्यांतर ते गंगास्नान करुन पवित्र झाले का? असा उलटा सवाल नाना पटोले यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवरही हल्लाबोल केला आहे. केंद्रातील मोदी सरकारचे पाप झाकण्यासाठी भ्रष्टाचाराच्या नावाने वातावरण निर्मिती करण्याचे काम भाजपा करत आहे. हे सर्व थांबवा व महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वजण मिळून काम करु असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com